Forest Guard Recruitment Scam :छत्रपती संभाजी नगरातून उत्तरे आणि परीक्षा नागपुरात दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
Maharashtra Forest Guard Recruitment 2023 : Forest Guard Scam हायटेक कॉपी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजी नगरच्या एमआयडीसी सिडकोमध्ये या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश करत एकाला अटक केली असून दोन जण फरार आहेत. असे सांगण्यात आले आहे. त्या उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना मोबाईलवरून उत्तरे सांगितली जात होती. सुंदरवाडी भागातील संभाजीनगर शहरातील शिवराणा करिअर अकॅडमीत छापा टाकून पोलिसांनी कॉपी रॅकेटचा भांडाफोड केला. या अकॅडमीत चालकासह त्याचा अन्य एक साथीदार फरार झाला आहे. असे पोलिसांनी सांगितले आहे.
छत्रपती संभाजी नगरातून उत्तरे आणि परीक्षा नागपुरात दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनोद डोभाळ याला अटक केली आहे. संभाजीनगर शहरातील शिवराणा करिअर अकॅडमीतून हे रॅकेट सक्रीय होते. यामध्ये, सचिन गोमलाडू, विनोद डोभाळ यासह अन्य एक व्यक्ती हायटेक यंत्रणेद्वारे परीक्षार्थींना उत्तरे पुरवत होती. पोलिसांना याची गोपनीय माहिती मिळताच छापा टाकून एकाला अटक केली व सर्व सामान हस्तगत केले.
चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. विनोद डोभाळ याच्या वनरक्षक परीक्षेला बसलेल्या उमेदवारांकडून तब्बल १० लाख रुपये घेऊन त्यांना मोबाईलद्वारे उत्तरे सांगितली जात होते. उत्तरे सांगणाऱ्या चौघांना प्रत्येकी ५० हजार रुपये देणार असल्याचे समोर आलं आहे. तसेच ही टोळी किती जणांना उत्तरे सांगत होती. याचा देखील तपास पोलीस करत आहेत.
शिवराणा करिअर अकॅडमीच संचालक गोलमाडू हा रॅकेट चालवित आहे. नागपूरमध्ये बसलेल्या एका परीक्षार्थीला ही सगळी मंडळी उत्तर देत होती. चौकशीत पोलीस या सगळ्या प्रकरणात वनखात्याच्या देखील संपर्कात असून हा परीक्षार्थी कोण याचाही शोध घेत आहेत.
Leave a Reply