शेतीची मोजणी करून देताना चूक करणे खुणा कायम न करणे तसेच क्षेत्रफळात तफावत निर्माण केल्याप्रकरणी खामगाव येथील भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक आसह मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला पंचवीस हजार रुपये दंड केल्याचा आदेश नागपूर येथील राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे.
खामगाव तालुक्यातील राहुल येथील दीपक प्रल्हाद इंगळे यांनी त्यांची शेत जमीन मोजणी साठी तहसीलदार खामगाव यांच्याकडून एम एल आर कायद्याने नियम 84 2 नुसार मोजणीचा आदेश प्राप्त केला उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय खामगाव यांना मोजणीचा आदेश दिला.
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग. |
त्यानुसार मोजणी शुल्क ही भरले त्यावर भूमी अधीक्षक कार्यालयाने चुकीची मोजणी करत हद्दीच्या खुणा ही कायम केल्या नाहीत.
शेतजमिनी झालेले क्षेत्रफळ नेमके कोणत्या गटात अतिक्रमण झाले ही बाब नकाशात नमूद केली नाही तसेच क्षेत्रफळा मध्ये तफावत निर्माण केली.
हे प्रकरण पेड सर्विस या व्याख्या अंतर्गत सेवेत त्रुटी निर्माण केल्याची आहे ही बाब फेरात प्रकरण ऍड चैतन्य जोशी यांच्यामार्फत बुलढाणा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात दाखल करण्यात आली.
प्रसारित झाल्याने त्या आदेशान्वये विरुद्ध राज्य ग्राहक तक्रार निवारण मंच नागपूर यांच्याकडे आव्हान देण्यात आले.
सुनावणी पीठासीन अधिकारी डॉक्टर एस के काकडे न्यायिक सदस्य झेड काझी यांच्यासमोर झाली. करन आज 24 जुलै दोन हजार बावीस रोजी आदेश पारित करण्यात आला.
त्यामध्ये जिल्हा मंचला खारीज केला तसेच तत्कालीन उपअधीक्षक भूमिअभिलेख वंदन जाधव मोजणी अधिकारी लोंढे या दोघांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला सोबतच मोजणी आदेश प्राप्त दिनांकापासून दहा दिवसांच्या आत शेतजमीन हद्दीच्या खुणा कायम करुन घ्या असेही बजावले आहे.
ग्राहक म्हणून तुम्ही जागरूक असणे, जागे असणे काळाची गरज आहे!
चुकीच्या मोजणीविरुद्ध ग्राहक मंचाने दिला उपाधीक्षक भूमी अभिलेख यांना दणका…
ग्राहक म्हणून आपण चुकीच्या व बेकायदेशीर मोजणी विरुद्ध ग्राहक मंचात दाद मागू शकता,
कारण मोजणीसाठी आपण ग्राहक म्हणून फीस अदा केलेली आहे…