माहिती अधिकार कायद्याचा चा दणका
शिरपूर तालुका प्रतिनिधी : बलकुवा ता शिरपुर जिल्हा धुळे येथील तत्कालीन ग्रामसेवक एम एस मराठे हे दिनांक 01/8/2020 ते 31/10/2021 पर्यत च्या कालावधी मध्ये बलकुवे ग्रामपंचायत ला ग्रामसेवक या पदावर कार्यरत होते तेव्हा मुख्यालयी न रहाता उचल केलेला 59010 (एकोणसाठ हजार दहा रुपये फक्त) रुपये घरभाडे भत्ता पंचायत समिती शिरपूर स्तरावरुन वसुल करण्याचे काम सुरू.
माधवराव फुलचंद दोरीक मु पो बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे.
ग्रामसेवक ने मुख्यालयी न रहाता उचल केलेला घरभाडे भत्ता पंचायत समिती कडून वसुल करण्याचे काम सुरू. |
सन 2020 मध्ये तत्कालीन ग्रामसेवक एम एस मराठे हे बलकुवे येथे मुख्यालयी राहत नसल्याने त्यांचे विरुध्द पंचायत समिती शिरपूर येथे मा गटविकास अधिकारी यांचे कडे नोव्हेंबर सन 2020 मध्ये ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्याने त्यांनी उचल केलेला घरभाडे भत्ता त्यांचे कडुन वसुल करण्यात यावा अशी तक्रार दाखल केली होती.
तरी त्या संदर्भात मी पाठपुरावा केला असता अखेर मा तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी दिनांक 22/11/2021 रोजी त्यांचे पगारातुन उचल केलेला घरभाडे भत्ता समान हप्त्यांत वसुल करण्यात यावा असा आदेश पारित केला होता.
परंतु सदर आदेशाची अंमलबजावणी करुन त्यांचे पगारातुन कपात करुन पैसे वसुल झाले किंवा नाही त्या संदर्भात मी दिनांक 19/09/2022 रोजी माहिती अधिकार अर्ज करुन पंचायत समिती येथे विचारणा केल्याने मला पंचायत समिती शिरपूर (ग्रा पं विभाग) येथील जनमाहीती अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांनी दिनांक 27/09/2022 ला रजिस्टर पोस्टाने पाठवलेली माहिती च्या आधारे त्या कालावधीत ग्रामसेवक यांनी बलकुवे ग्रामपंचायत ला मुख्यालयी न राहाता उचल केलेला एकुण 59010 (एकोणसाठ हजार दहा)रुपये चा घरभाडे भत्ता दरमहा 4000,(चार हजार रुपये) समान हप्त्यांत वसुल करण्यात येत आहे.
तरी सदर पैसे माहे मे महिन्यापासुन सुरू केले आहे आज पर्यत मिळालेली माहिती च्या आधारे 12000, रुपये (बारा हजार रुपये) वसुली झाले आहेत व उर्वरित रक्कम 43010 (त्रेच्याळीस हजार दहा रुपये) बाकी असे कळवले आहे तरी मी तक्रारीचा पाठपुरावा केल्यामुळे मला अखेर 20 महिन्यात यश मिळाले आहे तरी नागरीकांनी आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करत रहावा उशीरा का होईना परंतु न्याय जरुर मिळतो
सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही.
Leave a Reply