Gramin Batmya

weather today Live

Holi Story of Tribal Community In Marathi.
Tribal Area News

आदिवासी समाजाची होळी | Holi Story of Tribal Community In Marathi.

आदिवासी समाजाची होळी | Holi Story of Tribal Community In Marathi. उवी/होळी या सणाला आदिवासी समाजात अनन्यसाधारण महत्व आहे। हूवी (होळी) आदिवासी समाजाची होळी- डॉ विजयसिंग वसंतराव पवार

काळाबरोबर सांस्कृतिक परमपरेतिल या सणाला धार्मिक अनुष्ठान प्राप्त झाले अणि आज हा सण आपल्या समाजाचा एक अविभाज्य घटक बनलाय। होळी आधी काही प्रमुख गावान मधे “भोगर्या बाजार” भरतो व खरेदीसाठी पावरा समाज सज्ज होतो लहनानपासून वृद्धान पर्यन्त एकच उत्साह बघायला मिळतो। खरेदीसाठी मोठ मोठ्या रांग कपडे; चंदीचे दागिने; विशेष सजवतीच्या टोपल्या ;पुजेसाठी सखरेचे कंगन डाल्या. खरतर पारंपरिक वेशभूषा करुन होलीचि तयारी करने अणि पुजेसाठी सामान गोळा कारणे दागदागिने खरेदी करने यामागच हेतु

काळाच्या ओघात शुभ मुहूर्त म्हणून होळीला स्तान प्राप्त झाले असावे। Holi Story of Tribal Community In Marathi.

ह्या भोंगऱ्या बाजारात ढोल, मांदल, थाली, बासुरी या पारंपरिक वाद्यांची पूजा साहित्याची; खरेदी चालू असते अणि त्यांच्या तालीवर “खुड़ी” पावरा नृत्यहि या भोगर्या बाजारात दिसत वर्षभराची खरेदी या बाजारात केलि जाते.त्यामुळे होळीपुरवि भोगर्या बाजाराला होळीपूर्वीचा शंखनाद म्हणता येईल। या होळीकोत्सवचि सुरवात होते माघ पौर्णिमेपासून गावच्या होळी उभारायच्या ठिकाणी होळीचा डांडा उभारला जातो अणि सुरवात होते अश्या उत्सवपर्वचि ज्याचे स्तान पावरा समाजात लखमोलाचे आहे। 

जीवनात नवचैतन्य फुलविणारा होलिकोत्सव जसजसा समीप येतो तसतसे पावरा समाजात उत्साहचे वातावरण निर्माण होते। गावापासून दूर शिक्षण व नोकरी करणारे पावरा बंधू-भगिनी आपापल्या गावी परतात ते या उत्साहाच्या ओडिने सगळ्या प्रकारच्या मनमुटाव विसरून प्रेमाने लहान मोठे सगळेच या उत्साहात शामिल होताना दिसतात। क्वचित् समाजातील विसंगति दूर करण्यागे पूर्वजांच हेतु असावा। पारंपारिक वेशभूषेत दाखल झालेल्या पावरा समाजबंधव रंगीबेरंगी वस्त्रे, चांदीच दागिने,मोरपिसांची टोप, कंबरेला बांधावयाचे लहान-मोठे घुंगरु, टोपली, अणि वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करुन सज्जा असतात।

तर एकीकडे ढोल, मांदल, थाळी, बासरी, आदी पारंपारिक वाद्यांच्या तालावर लहान मुलांपासून तर वृध्दांपर्यंत पावरा नृत्यावर खुड़ीवर नाचायल आतुर।

पारंपारिक वाद्यांच्या तालावर पाऊले थिरकू लागतात।

पावरा समाजात होलिकोत्सवाचे महत्व सामाजिक मेळाव्या सारखे असते जिथे विचारांचे आधान प्रधान होते अणि लहान मोठ्यांचा भेद विसरून सामाजिक एकोप निर्माण होतो. तस पहिला तर पावरा समाजाचे प्रतेक सण; विधि हे सामाजिक एकोपच सन्देश देतात

Holi Story of Tribal Community In Marathi.
Holi Story of Tribal Community In Marathi.

 

होळीच्या दिवशी उत्साहाला उधाण येते. | Holi Story of Tribal Community In Marathi.

ढोल (मांदल), थाळी, बासरी, आदी पारंपारिक वाद्यांच्या तालावर सगळ्या वयाचे; स्तराचे;अधिकारी असो नोकरवर्ग असो की पुढारी सगळे बेभान होऊन नाचत असतात अणि यालाच सामाजिक एकोप म्हणतात। या माध्यमातून जगाला एक सन्देश दिला जातो की जो पर्यन्त आम्ही आमचे सण विधि पाळत राहु आमची एकी कुणी मोडू शकणार नाही।

दुसर्या दिवशी 

म्हणजे धुलिवंदनला दुपारी पारंपारिक पद्धतीने नवस फेडण्याची प्रथा आहे. होळीच्या निखार्‍यातून अनवाणी चालत हा नवस फेडला जातो. असा हा सामाजिक एकोपाचा आपला सण होळी(उवी) याला आपल्या जीवनात महत्व प्राप्त करून देणे गरजेचे आहे जेणेकरुण आपली एकी जन्मोजन्मि राहील अणि येणाऱ्या पिढीला बांधून ठेवेल।

होळीची गोष्ट.

  • होळी ही पोरब राजाची मुलगी:
  • ‘होळी’ ही पोरब नामक राजाची मुलगी होती. 
  • दिसायला ती सुंदर तर होतीच सोबत ती अनेक कलांगुणांनी निपुण होती. 
  • ती एका ‘भोंगडा’ नामक आदिवासी तरूणाच्या प्रेमात पडते. 
  • तो बांबूपासून वस्तू तयार करण्याचे काम करीत असतो. 
  • त्याची कला पाहुन ती फारच भारावून गेली असते. 
  • मा‍त्र एका देवाच्या मुलीचे एका आदिवासी तरूणाच्या प्रेमात पडणे, हे इतर देवांना मान्य नव्हते. 
  • त्यामुळे राजा पोरब त्या दोघांमध्ये येऊन उभा ठाकतो. 
  • मात्र होळीचे प्रेम हे निस्सिम होते.  
  • आपले प्रेम खरे आहे, 
  • हे सिध्द करण्‍यासाठी ती अग्नीच्या पेटत्या ज्वालांमध्ये उडी घेते.  
  • मात्र तिचे प्रेम सत्य असल्यामुळे ती अग्निज्वालातून जिवंत चालत येते.  

हा चमत्कार पाहून पोरब राजाला त्याची चूक कळते व तो तिचा विवाह बांबूपासून वस्तू तयार करणार्‍या आदिवासी तरूणाशी लावून देतो.  अशा प्रकारची आख्यायिका आपले आदिवासी बांधव सांगतात.  अग्नीची पूजा करणारा आदिवासी खरा निसर्गपूजक होळीद्वारे आपली संस्कृती आजही जपत आहे.  खरं तर होळी म्हणजे जाती-धर्माच्या भिंती ओलांडून साजरा होणारा लोकोत्सवच आहे. म्हणूनच तर होळी म्हणजे आदिवासींचा दीपोत्सवच आहे, असे म्हटले जाते.

आदिवासी होळीतिल नृत्य. | Holi Story of Tribal Community In Marathi.

गेर्या.

होळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गेर नृत्यासाठी” पावरा लोक ख्यातनाम आहेत. गेर ही होळीत उपवास पाळणारी मंडळी, मानता किंव्हा नवस म्हणून हि मंडळी गेर वेष धारण करते, अनवाणी 5 दिवस होळीचे गाव फिरणे, अंगावर पाणी न टाकता, पायाला शेण आणि ओली माती न लागू देता 5 दिवस गावो गावी हे लोक होळी साजरी करतात, सव्वा महिना जेव्हापासून गावचा होळीचा दांडा उभारला जातो हे लोक उपवास धरतात, ज्या गावात असतील तिथे घरो घरी अंगणात जाऊन हे लोक नाचतात आणि त्या त्या घरून दिलेले प्रसाद गोळा करतात, प्रसादात: साखरेचे कंगण, डाळ्या, गुल, नारळ आणि काही ठिकाणि पैसेही मिळतात याला *पाऊर* ही म्हणतात, काही ठिकाणी महूची दारूही पाजली जाते। गेर नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजन करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात.

 नाचणा-याचेप्रकार / Holi Story of Tribal Community

1) बाव बूद्या:

    हे गेर नृत्यातील नर्तक असतात. यांचा पेहराव आकर्षक असतो. डोक्यावर बांबूपासून तयार केलेला टोप असतो. अंगावर पांढर्‍या रंगाने नक्षी वा रेषा काढलेल्या असतात. गळ्यात माळा असतात. कंबरेभोवती दूधीभोपळ्याची फळे बांधलेली असतात. हातात तलवार वा लाकडी बांबूची काठी असते. व कंबरेला व पायात घुंगरू बांधलेले असतात. हे घुंगरांच्या ठेक्यावर किंवा ढोलाच्या ठेक्यावर नाचतात. एका तालात नाचणे व घुंगरांचा आवाज यावर या बावाबुद्धयांचे नृत्य पाहण्यासारखे असते.

2) प्राण्याचा वेष.

 प्राण्याच्या वेषात अस्वल, वाघ इत्यादी प्राणी असतात. यांना नाचण्याचे बंधन नसते, हे लोक लोकांचे मनोरंजन करतात व आपल्या संघाचे रक्षण करतात.

3) काली:

प्रत्येक संघात एक चेटकीण असते. तोंड व संपूर्ण अंग काळ्या रंगाने रंगवलेला माणूस ही भूमिका करतो. त्याच्या हातात सूप व लाकडी पळी (मोठा चमचा)असतो. ह्यामुळे आपल्या संघाला कोणाची नजर लागत नाही. आपल्या संघाचे रक्षणाची जबाबदारी यांच्यावरसुद्धा असते.

(काळानुसार व शिक्षित बदल पाहता काही प्रथा लोप पावल्या आहेत, आणि वेळेनुसार बदल महत्वाचे)

  •  होळीतिल दांडा महिना उत्सवाचा प्रतीक.

दांडा महिण्यागोदरच शेतीची कामे उरकवली जातात जेणे करून वर्षातून एक महिना पुरेसा आराम घेता यावा.

  • पण दांडा महिन्यात लग्न केली जात नाही.

ह्याच महिन्यात होळीच्या आदल्या दिवशी येणार भांगोर्या बाजार म्हणजेच होळीच्या खरेदीचा केंद्रबिंदू…..

बाजाराचा पहिला दिवस हा *गुलाल्या बाजार* म्हणून प्रचलित आहे, गुलाल उधळून भोंगऱ्या बाजाराची सुरवात केली जाते आणि म्हणूनच होळीपूर्वीचा शंखनाद अस ह्याला म्हणता येईल फाल्गुनोत्सवानिमित्त भोंगर्‍या बाजार हा प्रसिद्ध आहे पूर्ण जगात.

ज्याठिकाणी भोंगर्‍या बाजार भरतो त्याठिकाणी आजू-बाजूच्या परिसरातील पावरा बांधव एकत्र येतात. वर्षभराचे अन्नधान्य, नवीन कपडे परिधान केले जातात. पारंपारिक ढोल, बासरी आदी वाजवून मनसोक्त नाचले जाते. 

होळी निमित्त नवस.

ह्या उत्सवासाठी नवस ठेवला जातो, उददेश होळी आईला खुश करून तिला आधी वेगवेगळ्या प्रकारचे धान्य अर्पण केले जाई नंतर प्रत्येकाच्या घरून विविध प्रकारचे पंच पक्वान्न एकत्र गोळा करून प्रसाद वाटलं जात असे त्यास पारण असे म्हटले जात असे हे खाऊन नवस/उपवास सोडला जात असे. होळी पेटवल्यानंतर तीचा दांडा पडायच्या दिशे वरून येणाऱ्या पावसाळ्याचे/ वर्षाचे अनुमान बांधले जात असे, उपवास ही त्याच साठी असतो.

मोठी होळी, छोटी होळी. / Holi Story of Tribal Community

पूर्वी पावरा समाजातील अनेक गाव एकत्र येऊन, होळीसाठी ठराव करत आणि होळी करण्याची जागा आणि तारीख निश्चित करत, तत्पूर्वी आजूबाजूच्या पाच गावात कुणी खूप आजारी तर नाही, देवी किंव्हा *कांजण्या* (होळी ला येणाऱ्या लोकांमध्ये हा आजार पसरू नये , असे शास्त्रीय कारण असावे या मागे)

आजार तर नाही ना यावर विशेष लक्ष दिले जाते, कुणी प्रसिद्ध व्यक्ती मरण पावली असेल किव्हा गावावर काही विपदा ओढावली असेल हे पाहिलं जातं आणि त्यावरून होळी छोटी की मोठी करायची यावर शिक्कामोर्तब केले जात।

  • छोटी होळी : ही शेणाच्या गौर्या जाळून मनवली जाते
  • मोठी होळी : ही लाकडाच्या ओढ्यानी केली जाते

होळीपूर्वीचा हाट बाजार भोंगऱ्या. | Holi Story of Tribal Community In Marathi.

दांडा  महिना चालू झाला की होळी भरण्याच्या ठिकाणी होळीचा दांडा उभारला जातो,

दांडा महिण्याअगोदरच शेतीची कामे उरकवली जातात जेणे करून वर्षातून एक महिना पुरेसा आराम घेता यावा. पण दांडा महिन्यात लग्न केली जात नाही ह्याच महिन्यात होळीच्या आदल्या दिवशी भरतो तो म्हणजे

भांगोर्या बाजार.

होळीच्या खरेदीचा केंद्रबिंदू होळीचा हाट बाजार. बाजाराचा पहिला दिवस हा 

गुलाल्या बाजार.

म्हणून प्रचलित आहे, गुलाल उधळून भोंगऱ्या बाजाराची सुरवात केली जाते आणि म्हणूनच होळीपूर्वीचा शंखनाद अस ह्या दिवसाला म्हणता। फाल्गुनोत्सवानिमित्त भरणारा भोंगर्‍या बाजार हा जगात प्रसिद्ध आहे. परंतु या बाजाराबद्दल अनेक गैरसमज बाहेरच्या जगात आहेत. मुली पळविल्या जातात, लग्न करणाऱ्यांसाठी जोडपे पळतात, गुलाल लावला जातो आणि आपला जीवनसाठी निवडला जातो वगैरे ।

परंतु असा कुठलाही प्रकार या बाजारात होत नाही हे ठामपणे पटवून द्यायला हवे. पारंपारिक कारण असे की दांड्याच्या महिन्यात कोणतेही व्यवहार केले जात नाही, लग्न जोडले जात नाहीत, मग मुली पळवून लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही. समाजातील कोणत्याही आपल्या वरिष्ठ मंडळींना विचारल्यास याची प्रचिती येते, पोरीला साधा गुलाल लावायचं सोडा, छेड जरी काढलीत तरी महायुद्ध होईल, कारण या बाजारात प्रत्येकजण शस्त्राशस्त्र घेऊन असतो त्यामुळे हिम्मतही कुणी करू पाहणार नाही.

ज्याठिकाणी भोंगर्‍या बाजार भरतो त्याठिकाणी आजू-बाजूच्या परिसरातील आदिवासी पावरा बांधव एकत्र येतात.  वर्षभराचे अन्नधान्य, नवीन कपडे परिधान व खरेदी केले जातात, होळीपूजनासाठी लागणारे साहित्य विकत घेतली जातात, होळी सुरू झाली या जल्लोशात पारंपरिक ढोल, बासरी आदी वाजवून मनसोक्त नाचले जाते.

होळी हा आदिवासी समाजाचा पवित्र सण आहे आणि दांडा हा पवित्र महिना, त्यामुळे याचे जितके अप्रचार आहेत ते अगदी खोटे आहेत, होळी हा सण म्हणजे उल्हासाचा आणि जनसम्पर्क साधून लोकांना एकत्र आणण्याचा पूर्वजांचा प्रयत्न आहे, सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी केलेला पूर्वजांचा एक आनंद सोहळा आहे. या अश्या महान सोहळ्याचा आणि पर्वाचा अपप्रचार होणे हे दुर्दैवी, ज्या जल्लोषात आपण हा सण मणवतो त्याच प्रमाणे प्रखरपणे या बद्दलची खरी माहिती लोकांपुढे आणावी आणि प्रचार करावा ही सर्व समाजबंधूंना विंनती।

आपलाच समाजबांधव -डॉ विजयसिंग वसंतराव पवार (अंबापूर)

Holi story of tribal community in Marathi. Click here to read.

टीप.

या बाजाराबद्दल अनेक गैरसमज आहेत बाहेरच्या जगात.  मुली पळविल्या जातात, गुलाल लावला जातो परंतु असा कुठलाही प्रकार यात होत नाही हे त्याना पटवून द्यायला हवे. कारण दांड्याच्या महिन्यात कोणतेही व्हवहार केले जात नाही, लग्न जोडले जात नाहीत, मग मुली पळवून लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही, कोणत्याही आपल्या वरिष्ठ मंडळींना विचारल्यास याची प्रचिती तुम्हाला येते, पोरीला साधा गुलाल लावायचं सोडा, छेड जरी काढलीत तर महायुद्ध होईल ह्या बाजारात, कारण या बाजारात प्रत्येकजण शस्त्राशस्त्र घेऊन असतो त्यामुळे हिम्मतही कुणी करू पाहणार नाही. Holi Story of Tribal Community

Important Information Links

Holi Story of Tribal Community

Notification 

(जाहिरात)

     येथे क्लिक करा 

Holi Story of Tribal Community

Official Website

(अधिकृत वेबसाईट)

     येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp        येथे क्लिक करा 
Join Us On Telegram      येथे क्लिक करा 
Join Us On Instagram       येथे क्लिक करा 
Join Us On Facebook      येथे क्लिक करा 

बारा मोहिना होली | Adivasi holi 2024 | Holi Song 2024 – YouTube

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !