Illegal Rule |
महसुल खाते पोलीस खाते आणि आर. टी. ओ. विभाग यांचे नियम पायदळी तुडवत मराठवाड्यातून शेवगाव तालुक्यात वाळु वाहतुक जोमात कारवाई न केल्यास शिवसंग्राम पक्षाचे लवकरच रस्ता रोको फिरोझ पठाण.
बेकायदेशीर नियम नागरिक त्रस्त.
शेजारच्या बीड जिल्ह्याच्या हद्दीतून बेकायदेशीर नियम धाब्यावर बसवून रोज शकडो डंपर ट्रॅक्टर विना क्रमांकाचे भरधाव वेगाने वाहतुक करत असतात याचा त्रास बोधेगाव बालंमटाकळी चापडगाव राक्षी पिंगेवाडी आणि शेवगांव तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे कोणाच्या आशीर्वादाने हि वाहतुक सुरळीत चालु आहे?
जीवघेणे हल्यामुळे नागरिक त्रस्त
यातुन गबबर झालेले बागडबिल्ले शेवगांव शहरात घालतात हैडोस तालुत्यात पुर्व भागातील मुंगी हातगांव कांबी मुरमी सुकळी शेकटे सोन विहीर पिंगेवाडी आदी भागात धुमाकुळ घातला आहे *यां विरोधात शेवगांव तहसीलदार यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे यांपूर्वी हि यां भागात तलाठी पोलीस सामाजिक कार्यकार्ये पत्रकार यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले आहेत यां बाबत स्थानिक पोलीस प्रशासनाकडे हि अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत.
ताजा कलम*
*यातील काही माजलेली बोकडं शेवगांव शहरातील रेडलाईट एरियात शिवनगर भागात दारु पिऊन गावठी कट्ट्याच्या जीवावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना धमकाऊन त्यांचे शोषण करत आहेत मागेही यां भागात तलवारीने मारामाऱ्या झाल्या होत्या पण यां भागात पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने “वेश्या व्यवसाय आणि वाळु चोर जोमात” सर्वसामान्य नागरिक कोमात अशी अवस्था झाली आहे आमची तक्रार पोलिसात केली तर तुझा जीवच घेऊ अश्या पोकळ धमक्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना कानाला गावठी कट्टे लाऊन देण्यात येते “उद्धवा अजब तुझे सरकार”!!!
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
Next page…
Leave a Reply