LPG Grahak | घरगुती गॅससोबत ५० लाखांपर्यंतचा विमा.

घरगुती गॅससोबत ५० लाखांपर्यंतचा विमा-

स्वयंपाकाच्या गॅससोबत (एलपीजी) ग्राहकास ५० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. ग्राहक अधिकारांतर्गत ही सुविधा मिळते. अनेकांना याबाबत माहिती नसते. याबाबत जाणून घेऊया.


एक्स्पायरी डेट तपासून घ्या-

एलपीजी सिलिंडरलाही एक्स्पायरी डेट असते. ती पाहूनच सिलिंडर घ्यायला हवा. कारण विमा सिलिडरच्या एक्स्पायरी डेटशी जोडलेला असतो. एक्स्पायरी डेट संपलेली नसेल तरच विमा मिळतो. त्यामुळे एक्स्पायरी डेट जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.


असा असतो विमा-

गॅस जोडणी घेताच ग्राहकास अपघाती विमा संरक्षण सुरू होते. सिलिंडरचा स्फोट होऊन ग्राहकाचा मृत्यू झाल्यास ५० लाखांपर्यंत विमा दावा दाखल करता येतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा मासिक हप्ता भरावा लागत नाही. दुर्घटनेनंतर पीडित कुटुंबातील सदस्य हा दावा दाखल करू शकतात.


असा करा दावा-

दुर्घटना घडल्यास ३० दिवसांच्या आत गॅस डिस्ट्रिब्यूटर आणि ३ पोलिस ठाण्यास याची माहिती द्यावी लागते. दाव्यासाठी पोलिसांच्या एफआयआरची प्रत आवश्यक आहे. याशिवाय मेडिकल बिल, हॉस्पिटलचे बिल, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि मृत्यू प्रमाणपत्रही आवश्यक असते. ज्याच्या नावे सिलिंडर आहे, त्यालाच विमा रक्कम मिळते. पॉलिसीत नॉमिनी बनविता येत नाही. सिलिडरचा पाइप, शेगडी, रेग्युलेटर ही उपकरणे आयएसआय मार्कची असतील तरच विम्याची रक्कम मिळते. सिलिंडर, शेगडीची नियमित तपासणीही आवश्यक आहे.

कोण देते विमा दाव्याचे पैसे-

दुर्घटना घडल्यास डिस्ट्रिब्यूटर हा तेल कंपनी आणि विमा कंपनीस दुर्घटनेची माहिती देतो. सिलिंडरचा अपघात झाल्यास विम्याची रक्कम इंडियन ऑइल, एचपीसीएल आणि बीपीसीएल यांसारख्या तेल कंपन्या देतात. ही या कंपन्यांची जबाबदारी आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !