महाराष्ट्र नागरी सेवा नियम शासन निर्णय संपूर्ण माहिती PDF सह वाचा : Maharashtra Nagari Seva Niyam Shasn Nirnay 2024
भारताचे संविधान.: नुसार महाराष्ट्र नागरीसेवा जेस्ठतेचे विनियमन नामावली व नवीन नियम क्रमांक एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा.- भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात | आलेल्या अधिकारांचा वापर करून, यापूर्वी दि. २१ जून १९८२ रोजी अधिसूचित केलेली महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली व या संदर्भात तदनंतर निर्गमित केलेले सर्व आदेश किंवा अभिलेख अधिक्रमित करुन महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे पुढीलप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली हे नवीन नियम करीत आहेत :-
संक्षिप्त नाव, प्रारंभ आणि प्रयुक्ति – Maharashtra Nagari Seva Niyam Shasn Nirnay
- संक्षिप्त नाव – या नियमास “महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१” असे म्हटले जाईल.
- प्रारंभ आणि प्रयुक्ति. – ही नियमावली दिनांक २१ जून २०२१ रोजी अंमलात येईल आणि ज्यासंबंधी नियम करणे हे शासनाच्या अखत्यारीत येते अशी सर्व पदे, संवर्ग व सेवा यामधील शासकीय कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता तदनंतर या नियमावलीच्या तरतूदीनुसार विनियमित होईल:
महाराष्ट्र नागरी सेवा जेस्ठतेचे नवीन नियम शासन निर्णय : Maharashtra Nagari Seva Niyam Shasn Nirnay
कोणतीही विशिष्ट पदे, संवर्ग किंवा सेवा यामधील ज्येष्ठतेचे विनियमन करण्यासाठी कोणतेही वेगळे नियम किंवा आदेश विहित केले असतील, त्याबाबतीत अशी पदे धारण करणाऱ्या व्यक्तींच्या किंवा अशा संवर्गातील अथवा | सेवेतील व्यक्तींची ज्येष्ठता असे वेगळे नियम किंवा आदेश यानुसार विनियमित करण्यात येईल.
संविधांची १०५ वी घटना दुरुस्ती
महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय कर्मचारी यांना हे नियम लागू राहतील. व्याख्या –
या नियमावलीत, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,
- (क) ” तदर्थ पदोन्नती” याचा अर्थ तदर्थ निवडसूचीस अंतिम मान्यता प्राप्त झाल्यावर देण्यात येणारी पदोन्नती..
- (ख) “तदर्थ निवडसूची” याचा अर्थ खालील नमूद परिस्थितीत, प्रशासनाची तातडीची गरज म्हणून तदर्थ पदोन्नती | देण्यासाठी तयार केलेली निवडसूची-
- (i) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांकरीता आयोग अथवा निवड समिती यांच्याकडे मागणीपत्र पाठविल्यानंतरच, मागणीपत्रातील पदसंख्येच्या मर्यादेतील रिक्त पदे भरण्याकरिता; किंवा
- (ii) शासकीय कर्मचारी प्रतिनियुक्तीवर गेल्याच्या कारणास्तव एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त राहणारी पदे भरण्याकरीता;
- (ग) “तुकडी ” याचा अर्थ नामनिर्देशनाद्वारे / सरळसेवेद्वारे कोणत्याही पदावर संवर्गात किंवा सेवेत थेट नियुक्ती करण्यासाठी आयोग अथवा निवड समिती यांनी त्यांच्याकडे पाठविलेल्या मागणीपत्रातील पदसंख्येच्या प्रमाणात उमेदवारांची एका शिफारसपत्राद्वारे नियुक्ती प्रधिकाऱ्याकडे पाठविलेली यादी.
Related Informational Post :
स्पष्टीकरण- Maharashtra Nagari Seva Niyam Shasn Nirnay
एका शिफारस पत्राद्वारे पाठविलेली यादी ही एक तुकडी म्हणून गणली जाईल. दुसऱ्या शिफारस पत्राद्वारे पाठविलेली यादी ही दुसरी तुकडी समजली जाईल;
ह्या शासकीय योजनेचे माहिती वाचाः विधवा पेन्शन योजना
‘सक्षम प्राधिकारी ” याचा अर्थ कोणत्याही पदावर, संवर्गात किंवा सेवेत नेमणूक करण्यास सक्षम असलेला प्राधिकारी;
” आयोग ” याचा अर्थ महाराष्ट्र लोकसेवा आयोग; Maharashtra Nagari Seva Niyam Shasn Nirnay
- (च) “कोणतेही पदावरील, संवर्गातील किंवा सेवेतील अखंड सेवा” याचा अर्थ कोणतेही पद, संवर्ग किंवा सेवा यासंबंधात “अखंड सेवा” याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने त्या पदावर संवर्गात किंवा सेवेत असताना अखंडपणे अथवा कोणत्याही वरच्या पदावर संवर्गात किंवा सेवेत राहून खालच्या पदावर, संवर्गात किंवा सेवेत प्रत्यावर्तन न होता अखंडपणे केलेली सेवा:
- परंतु एखादी व्यक्ती या नियमांच्या तरतुदी अन्वये नियुक्तीच्या मानीव तारखेपासून एखाद्या पदावर, संवर्गात किंवा सेवेत अखंडपणे स्थानापन्न असेल त्या बाबतीत, अशा व्यक्तीने अशा मानीव तारखेपासून अखंड सेवा केलेली आहे असे मानले जाईल;
- (छ) “मानीव दिनांक” याचा अर्थ या नियमावलीतील नियम ४ च्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यास नेमून दिलेला दिनांक:
- (ज) “थेट भरती केलेली व्यक्ती ” याचा अर्थ सक्षम प्राधिकाऱ्याने विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन नामनिर्देशनाद्वारे/ सरळसेवेद्वारे संबंधित पदासाठी / संवर्गासाठी / सेवेसाठी विहित केलेल्या सेवा प्रवेश नियमातील तरतूदींनुसार नियुक्त केलेली व्यक्ती;
- (झ) “अभावित नियुक्ती” याचा अर्थ, संबंधित सेवाभरती नियमांच्या तरतुदींनुसार नियमित नियुक्ती करणे प्रलंबित असेपर्यंत केलेली तात्पुरती नियुक्ती;
ज्येष्ठतेचे सर्वसाधारण तत्वे Maharashtra Nagari Seva Niyam Shasn Nirnay
शासकीय कर्मचाऱ्यांच्या अखंडीत सेवा कालावधोवरुन त्याची ज्येष्ठता निश्चित करणे. या नियमावलीतील अन्य तरतुदींच्या अधिनतेने, शासकीय कर्मचाऱ्याची कोणत्याही पदावरील, संवर्गातील किंवा सेवेतील ज्येष्ठता सामान्यपणे त्यांच्या त्या पदावरील, संवर्गातील किंवा सेवेतील अखंडित सेवाकालावरून निश्चित करण्यात येईल:
परंतु, जेव्हा रजा किंवा प्रशिक्षण किंव प्रतिनियुक्ती किंवा स्वीयेतर सेवा किंवा कोणत्याही अन्य पदावरील अस्थायी स्थानापन्नता, या कारणास्तव त्या पदावर, संवर्गात किंवा सेवेत त्या त्या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होईल तेव्हा तो कर्मचारी रजेवर किंवा प्रशिक्षणास किंवा प्रतिनियुक्तीवर किंवा स्वीयेतर सेवेवर किंवा कोणत्याही अन्य पदावर अस्थायी स्थानापन्नतेवर गेला नसता तर एरव्ही तो उक्त पदावर, संवर्गात किंवा | सेवेत राहिला असता असे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केले तर असा कोणताही अनुपस्थितीचा कालावधी हा अशा अखंडीत सेवाकालाची गणना करण्याच्या प्रयोजनार्थ विचारात घेतला जाईल:
महाराष्ट्र नागरी सेवा नियम शासन निर्णय संपूर्ण माहिती PDF सह वाचा : Maharashtra Nagari Seva Niyam Shasn Nirnay 2024 pdf
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
Maharashtra Nagari Seva Niyam Shasn Nirnay 2024 Pdf | येथे क्लिक करा |
Maharashtra Nagari Seva Niyam Shasn Nirnay 2024 Download PDF | येथे क्लिक करा |