म. रा. वि. वि. कं. मर्या. उपविभाग १ शिरपूर येथील उपकार्यकारी अभियंता यांनी श्री मा महाराष्ट्र राज्य विद्युत लोकपाल मुंबई यांचे आदेशाला दाखवली केराची टोपली.
माधवराव फुलचंद दोरीक बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे.
विद्युत लोकपाल मुंबई यांचे आदेशाला केराची टोपली |
शिरपूर प्रतिनिधी : अर्थे खुर्द ता शिरपुर जिल्हा धुळे येथे वेल्डींग कामाचे दुकान आहे तरी दिनांक 01/08/2021 रोजी माझ्या दुकानात पाच दिवस लाईट नसल्याने मी अर्थे खुर्द येथील म रा वि वि कं मर्या येथील कार्यालयात कनीष्ठ अभियंता यांचे कडे रितसर तक्रार दाखल केली होती.
नुकसान भरपाई मिळणे कामी.
परंतु माझे दुकानातील कामाचे नुकसान झाले म्हणून मी ग्राहक तक्रार निवारण मंच नाशिक येथे दिनांक 03/09/2021 रोजी नुकसान भरपाई मिळणे कामी तक्रार दाखल केली होती परंतु तेथे दोन महिन्यांत सुनावणी न झाल्याने मी दिनांक 27/10/2021 रोजी श्री मा विद्युत लोकपाल मुंबई येथे तक्रार दाखल केली होती.
अधिकारी यांचे विरुध्द दंड.
तरी त्याची आंनलाईन सुनावणी दिनांक 04/05/2022 रोजी झाली तरी मा लोकपाल यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकुन म. रा. वि. वि. कं चे अधिकारी यांचे विरुध्द 415 /रुपये चा दंड आकारला व ते पैसे दोन महिन्यांत माझ्या लाईट बिलात कपात करण्यात यावे असा आदेश दिले.
अभियंता यांचे कडे लेखी पत्र.
परंतु महावितरण कंपनी शिरपुर उपविभाग १ येथील अधिकारी यांनी सदर रक्कम कमी करुन बिल देणे बंधनकारक होते तरी त्या संदर्भात म. रा. वि. वि. कं. मर्या अर्थे येथे कनिष्ठ अभियंता व शिरपूर येथील उप कार्यकारी अभियंता यांचे कडे लेखी पत्र देऊन सदर दंडाची रक्कम कपात करुन बिल देण्यात यावे.
विद्युत लोकपाल मुंबई यांचे आदेशाला केराची टोपली.
असे कळवले होते परंतु त्यांनी मा विद्युत लोकपाल मुंबई यांचे आदेशाला केराची टोपली दाखवत मला पुर्ण बिल पाठवुन बिल भरण्यास भाग पाडले आहे तरी त्या संदर्भात मी मा विद्युत लोकपाल मुंबई येथे पुन्हा तक्रार दाखल करणार आहे.
Leave a Reply