Mgnrega | रोजगार हमी योजने अंतर्गत मिळालेल्या सिंचन विहीरीच्या रोजगार सेवकानेच केला निधीचा, अपहार आणि घोटाळा.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मिळालेल्या सिंचन विहीरीच्या निधीचा अपहार व घोटाळा.

कुऱ्हा ग्रामपंचायत येथील रोजगार सेवक सुदाम जुमडे यांनी सन 2011-2012 या कालावधीमध्ये सिंचन विहीर धारक हरिभाऊ खिरू चव्हाण यांच्या सिंचन विहीरचे काम अद्याप अपूर्ण असून हरीभाऊ चव्हाण असुशिक्षित असल्यामुळे त्याचा फायदा घेत संबंधित रोजगार सेवक ने त्यांच्या सिंचन विहिरीचा निधीचा अपहार / घोटाळा केला आहे. 

सिंचन विहिरीचे काम अर्धवट असून सिंचन विहिरीचे संपूर्ण काम झाले असे दाखवून निधीचा अपहार केला आहे हरिभाऊ चव्हाण यांना फक्त दोन वेळाच मजुराची रक्कम 30,000+30,000/- इतकाच निधी सिंचन विहीर चा भेटला. बाकी राहिलेली रक्कम काम पूर्ण झाली असे दाखवून पूर्ण रक्कम जॉब कार्ड असलेल्या मजुरांचा वापर करून राहिलेली रक्कमेची अपहार केली आहे.

राहिलेली बाकीची रक्कम 1,40,000/- इतका निधी अपहार केला आहे यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी तसेच अपहार केलेली निधी वसूल करून सिंचन विहिरीचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी सिंचन विहीर धारकांना तो निधी देण्यात यावा व जो कोणी अधिकारी भ्रष्ट असेल व निधीचा अपहार केला.

असेल अशा अधिकाऱ्याकडून ती रक्कम वसूल केल्या जावी व भ्रष्ट अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, आमची एवढीच विनंती आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि सिंचन विहिरीचे काम खरोखर पूर्ण झाले का काय सत्य आहे आणि काय असत्य याची पाहणी करून योग्य निर्णय घ्यावा व जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व हडपलेला निधी वसूल करण्यात यावा आणि ती रक्कम समोरील कामे पूर्ण करण्यासाठी सिंचन विहीर धारकाला मिळून द्यावी.

सिंचन विहिरीचे काम पूर्ण झाले असे आम्हाला ऑनलाईन रेकॉर्ड चेक केल्यानंतर कळाले त्याच्यानंतर आम्हाला कळालं की आमच्या विहिरीचा निधी न सांगताच काढला गेला आहे संबंधित रोजगार सेवकाने हे कृत्य केल आहे म्हणून आम्ही चौकशीची मागणी केली आहे.

हेही वाचा : रोजगार हमी फक्त नावालाच लिंक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !