तलाठी सज्जाच्या मुख्यालयी उपस्थित राहणे बाबतचा शासन निर्णय : GR Regarding Talathi staying at HQ

मुख्यालयी न राहणार्‍या सर्व दोषी अधिकारी फौजदारी गुन्हा दाखल करावा.

Mukhyalay N Rahnarya अहमदनगर : जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीमधील ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य विभागातील मुख्यालयी न राहणार्‍या सर्व दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांवर आणि खंडणी घेऊन त्यांना मदत करणार्‍या सरपंच, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल होण्यासाठी 11 जुलै 2022 पासून जिल्हा परिषद, अहमदनगर येथे बेमुदत धरणे आंदोलनाचे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनातील मागण्या खालीलप्रमाणे आहेत :- Mukhyalay N Rahnarya  

1) मुख्यालयी राहत असल्याचे अद्यापपर्यंत ग्रामसभेचे ठराव न देणार्‍या नगर जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीमधील ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य विभागातील सर्व दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांवर आणि त्यांचे बेकायदेशीरपणे घरभाडेभत्ता मंजूर करणाऱ्या वरिष्ठ अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

2) मुख्यालयी राहत असल्याचे पंचायत समितीमध्ये अद्यापपर्यंत लेखी पुरावे न देणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीमधील सर्वच विभागातील कार्यालयीन अधिकारी, कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करावा.

3) अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितिकडून कार्यरत असणार्‍या ग्रामपंचायत विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहत असल्याचे सादर केलेले बहुतांशी ग्रामसभेचे ठराव खोट्या माहितीचे असल्यामुळे ज्या त्या गावात प्रत्यक्ष जाऊन त्या सर्व ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यतेबाबत उलटतपासणी करावी. 

उलटतपासणी करताना सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष, पोलिस पाटील, काही ग्रामस्थ, घरभाड्याने दिलेल्या घरमालकांचे या सर्वांचे लेखी जबाब घेण्यात यावेत तसेच मुख्यालयी राहत असल्याचे ग्रामसभेचे ठराव देणार्‍या अधिकार्‍यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे लेखी जबाब घेण्यात यावेत.

मुख्यालयी न राहणार्‍या सर्व दोषी अधिकारी : Mukhyalay N Rahnarya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !