शिरपूर भाजपा तर्फे मन बात कार्यक्रम सोबतच पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंती निमित्त अभिवादन. (Pandit Deendayal Upadhyaya Jayanti.)
Pandit Deendayal Upadhyaya Jayanti.+ पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंती निमित्त. |
शिरपूर : दि. २५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात कार्यक्रम सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला.
शिरपूर शहरातील बबनराव चौधरी यांचा संपर्क कार्यालयात “मन की बात”चे प्रक्षेपण केले.
यावेळी बबनराव चौधरी यांनी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सोबत बसून मोदीजींचे विचार ऐकले. बलशाली भारत घडवण्याचे स्वप्न असलेल्या मोदीजींचे प्रेरणादायी विचार आज पुन्हा एकदा ऐकायला मिळाले.
जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त शिरपूर तालुका व शहर भाजपाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केल्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, पं. दीनदयालजी उपाध्याय यांचे जीवन राष्ट्रवाद, त्याग, सेवा आणि समर्पणाचे अद्वितीय उदाहरण आहे.
पंडितजींच्या अखंड मानवतावाद आणि अंत्योदयाची तत्त्वे अंगिकारून मोदी सरकार नवभारताच्या निर्मितीत गतिमान वाटचाल करत आहे. स्वतंत्र भारताच्या स्वराज्याविषयी एक नवीन आणि युगानुकूल दृष्टी त्यांनी दिली.
परंपरागत तत्त्वज्ञानात चालत आलेल्या भारतीय विचारसरणीला आपल्या सिद्धांतातून नवे रूप दिले. त्यांचे हे विचार आजच्या काळातही सार्थ ठरतात. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, मन की बात तालुका सहसंयोजक अजिंक्य शिरसाठ यांनी आपले विचार वक्त केले.
यावेळी जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, भाजपा अनु जाती मोर्चा प्रदेश चिटणीस महेंद्र खैरनार, मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, तालुका सरचिटणीस जितेंद्र सुर्यवंशी, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष लोटन पाटील, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर चिटणीस राधेश्याम भोई, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, पं. स. सदस्य यतीष सोनवणे, हिंगोणी सरपंच सोमा भिल,, शहर सहसंयोजक अनिल बोरसे, नंदु माळी, अरमान मिस्तरी, जयवंत पाटील, रविंद्र राजपुत, जगन्नाथ पाटील, कुणाल माळी, शुभम सोनार आदि उपस्थित होते.