पेसाच्या रिक्त जागा रोष्टर बिंदुनुसार पवित्र पोर्टलवर उपलब्ध करा – बिरसा फायटर्स.
Gramin Batmya शिरपूर: धुळे जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या शिक्षक पदांसह सर्व प्रकारच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलला उपलब्ध करून देणे, आणि रोष्टर बिंदुनुसार भरण्याची मागणी बिरसा फायटर्सने मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
हेही वाचा.
निवेदनात म्हटलेय की, धुळे जिल्हा ५ वी अनुसूची व पेसा क्षेत्रात येत असून, पेसा भरतीबाबत राज्यपाल यांनी दि. ५ मार्च २०१५ रोजी अधिसुचना निर्गमित केलेली आहे. मात्र धुळे जिल्ह्यात पेसा भरतीबाबत चुकीची पद्धत आणि उदासिनता दिसून येते. त्याच प्रकारे आदिवासी शिक्षकांची विशेष भरतीही (२०१९) ठप्प आहे. आता मात्र जिल्ह्यात शिक्षक पदासाठी पवित्र पोर्टल उपलब्ध करून देणे.
रोष्टर बिंदूनुसार सर्व रिक्त जागा आणि इतर सर्व प्रकारच्या पदांची पदभरती तात्काळ करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष मनोज पावरा, नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा, जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, जिल्हा सचिव साहेबराव पावरा, गेंद्या पावरा, शिवाजी पावरा, आदिवासी विकास परिषदेचे युवा उपाध्यक्ष दारासिंग पावरा, संजय खैरनार, नटराज रावताळे, जयसिंग पावरा, मनेश पावरा, राकेश पावरा, जगन पावरा आदी उपस्थित होते.