Police criminal News | पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न

Police criminal News : पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न | पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला डंपरने मारली धडक.

 

Police criminal News : पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न

Police criminal News : पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न

पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न

Police criminal News : पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न

Police criminal News : नेवासा पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या कलम ३०७च्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या गाडीला डंपरने धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत केल्याप्रकरणी गेवराई येथील सागर रमेश कर्डिले या आरोपीविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस नाईक तुकाराम भिमराव खेडकर (वय ३५) यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कुकाणा दूरक्षेत्र येथे हजर असताना पोलीस उपनिरीक्षक अहिरे यांनी माझ्यासह कॉन्स्टेबल नारायण डमाळे, संतोष खंडागळे यांना कळवले की जीवे मारण्याच्या प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यातील आरोपी सागर रमेश कर्डीले हा गेवराई शिवारात असून त्याच्याकडे पांढऱ्या रंगाचा डंपर आहे.

पोलिसांची थर्ड डिग्री म्हणजे काय? 

ही माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यास अटक करण्यासाठी आम्ही शासकीय वाहणाने रवाना झालो; परंतु अचानक सरकारी वाहन नादुरुस्त झाल्याने चालक संतोष खंडागळे यांची दैनंदिन वापराची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एमएच १२ जेसी ८४११ हिच्यामधून आम्ही गेवराई येथे गेलो.

आम्ही गेवराई शिवारात सागर कर्डीले याचा शोध घेत असताना कल्याण खाटीक यांच्या घराजवळ आम्हास एक विना नंबरचा डंपर दिसून आला. आम्ही खात्री करण्यासाठी खाली उतरलो असता, आम्ही पोलीस गणवेशात असलेले पाहून आरोपी सागर रमेश कर्डीले याने आमच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली व त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाचा डंपर चालु करुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला.

आम्ही स्कार्पिओ गाडीमधुन त्याचा पाठलाग करुन त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने डंपरने आम्हाला जीवे ठार मारण्याचे उद्देशाने स्कॉर्पिओ गाडीच्या डाव्या बाजुने जोराने धडक देऊन तो डंपर घेऊन पळून जात असताना आम्ही त्याचा पुन्हा पाठलाग केला. त्यानंतर डंपर रस्त्याला आडवा लावून तो एका विना नंबरच्या स्वीफ्ट गाडीमध्ये बसन पळून गेला.

 हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !