पूजा खेडकर प्रकरणाचा पर्दाफाश :संपूर्ण देशात खळबळ : Pooja Khedkar case stirs excitement in the country

पूजा खेडकर प्रकरणाचा पर्दाफाश :संपूर्ण देशात खळबळ : Pooja Khedkar case stirs excitement in the country

वैभव कोकाटने’ केले ‘एक्स’वर एक ट्वीट अन् पूजा खेडकर प्रकरणाचा पर्दाफाश : वैभव कोकाट यांच्या पोस्टमुळे गैरप्रकार उघडकीस.

पूजा खेडकर प्रकरणाचा पर्दाफाश :संपूर्ण देशात खळबळ : Pooja Khedkar case stirs excitement in the country

मुंबई, ता. १९ वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरविरोधात अखेर केंद्रीय आयोगाने कारवाईचा बडगा उगारला; मात्र संपूर्ण देशात खळबळ उडालेल्या या प्रकरणाला वाचा फोडली, ती वैभव कोकाट या तरुणाने. त्याने केलेल्या एका द्वीटमुळे पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आले आणि त्याची देशभरात चर्चा सुरू झाली. एका द्वीटमुळे एखाद्या आयएएस अधिकाऱ्याची नोकरीही जाऊ शकते, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते, असे वैभव कोकाट यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

वैभव कोकाट लोकसेवा : Pooja Khedkar case stirs excitement in the country

निवृत्त सनदी अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या पूजा खेडकर यांनी बनावट जात प्रमाणपत्र आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून आयएएस रैंक मिळवली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यूपीएससीसह केंद्र आणि राज्यातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.

असे झाले प्रकरण उघड…

अगदी काल-परवापर्यंत पूजा खेडकर कोण आहेत, हेही माहीत नसलेल्या हे प्रकरण कसे उघडकीस आणले, याबाबत ‘सकाळ’ला सांगितले. ते म्हणाले, पूजा यांच्या वागणुकीबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी एक अहवाल राज्य सरकारकडे पाठवला होता. एका मित्राच्या माध्यमातून तो माझ्यापर्यंत पोहोचला.

उत्सुकतेपोटी मी तो वाचला असता, एक प्रशिक्षणार्थी अधिकारी एवढा माज कसा दाखवू शकतो, याबाबत मला आश्चर्य वाटले. त्यानंतर या प्रकरणाच्या खोलात गेल्यावर ज्या ऑडी कारवर पूजा यांनी बेकायदा अंबर दिवा लावला होता, त्याचे फोटो मिळवले. हे पुरावे घेऊन पोलिसांकडे जाण्याचा पर्याय माझ्याकडे होता; मात्र या प्रकरणातील प्रशासकीय असंवेदनशीलता बघता पोलिसांकडे जाण्यापेक्षा समाजमाध्यमांवर ते पोस्ट करण्याचे मी ठरवले.

३६ जुलै रोजी पूजा खेडकर यांच्याबाबतची फोटोसह पोस्ट मी ‘एक्स’वर केली. अवघ्या २४ तासांत त्याला दोन लाखांपर्यंत रीच मिळाला. त्यानंतर सर्वच प्रसारमाध्यमांनी या पोस्टची दखल घेत बातम्या केल्या.

अनेक सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्त्यांनी मला फोन केले. त्यानंतर पूजा यांच्यासंदर्भात एकापाठोपाठ एक गैरप्रकार उघड होऊ लागले. राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाची दखल घेताच, केंद्र व राज्य सरकार कामाला लागले.

अनेकांचे धाबे दणाणले

खेडकर प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षांतील अनियमितता, नियुक्त्यांबद्दल असंख्य तक्रारींचा पूर वैभव यांच्याकडे येत आहे. प्रकल्पग्रस्त उमेदवार त्यांच्यावरील अन्यायाच्या तक्रारी आणत आहेत. या प्रकरणाचा धसका घेऊन अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले; तर अनेकांनी समाज माध्यमांवर लिहिणेही बंद केल्याचे वैभव यांनी सांगितले. ( Pooja Khedkar case stirs excitement in the country )

हे प्रकरण सर्वप्रथम शोधून काढले ते बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या वैभव कोकाट यांनी. सामाजिक आणि राजकीय विषयांवर लिखाणाची आवड असलेल्या वैभव यांनी एका पीआर कंपनीत काही काळ कामही केले. त्यांच्या एक्स हॅण्डलला २९ हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. ( Pooja Khedkar case stirs excitement in the country )

हेही वाचा :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !