Gramin Batmya

weather today Live

सातपुड्यातील रानमेवा 'भोकर'ला ग्राहकांकडून पसंती : Ranmewa Bhokar from Satpura is Preferred By Consumers
News

सातपुड्यातील रानमेवा ‘भोकर’ला ग्राहकांकडून पसंती : Ranmewa Bhokar from Satpura is Preferred By Consumers

सातपुड्यातील रानमेवा 'भोकर'ला ग्राहकांकडून पसंती : Ranmewa Bhokar from Satpura is Preferred By ConsumersRanmewa Bhokar from Satpura is Preferred By Consumers : सातपुड्यातील रानमेवा ‘भोकर’ला ग्राहकांकडून पसंती शिरपूर तालुक्यातील बोराडी परिसरात मागणी वाढती

बोराडी : शिरपूर तालुक्यातील बोराडी परिसरातील रानावनात फळास येणा- या भोकर या रानमेव्याला मागणी वाढताना दिसत आहे. ग्राहकांकडून भोकर या फळाला पहिली पसंती मिळत आहे. दरम्यान, कच्चा भोकऱ्यांची भाजीदेखील केली जात असल्याने हा खवय्यांसाठी हा पदार्थ मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.

शिरपूर तालुक्यातील बोराडी परिसरात बहुवैविध्यपूर्ण वृक्षराजीने समृद्ध सातपुड्याची पर्वतरांग आहे. बोराडीसह रानावनात तयार झालेला जांभूळ, तोरण, भोकर, आळू, जाम आदी रानमेवा खवय्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. अवकाळी पावसामुळे जरी तो बाजारात उशिराने दाखल झाला असला तरी सातपुड्यातील भागात भोकर या रानमेव्याला पर्यटकांकडून विशेष मागणी आहे. अनेकजण आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणात भोकर फळ आणत असतात.

कशी खाल भोकर : Ranmewa Bhokar from Satpura is Preferred By Consumers

भोकरीचा बार म्हणजेच कोवळी भोकर आणून मटकीच्या उसळप्रमाणे बनवली जाते. खाण्यात फार चविष्ट असते. ज्यांना याबाबत माहिती आहे, ती लोकं आवडीने मागणी करत असतात. तसेच या रानमेव्याची खासियत म्हणजे जंगल, माळरान,

  • आज हा रानमेवा संवर्धनाची गरज
  • जंगलांचे संरक्षण व संवर्धन करणे
  • आवश्यक आहे. जंगल वाचले तर
  • वकवाड येथील भारला रावताळे (पावरा) घराशेजारचे भोकरचे झाड.

बहुगुणी फायदे : Ranmewa Bhokar from Satpura is Preferred By Consumers

भोकराचे फळ कृमिनाशक, कफोत्सारक व खोकल्यापासून आराम देणारे आहे. कोरडा खोकला, छाती व मूत्र नलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, जखम व व्रण भरण्यासाठी भोकराचे फळ उपयुक्त आहे. सांधेदुखी, घशाची जळजळ यासाठीही भोकराचे फळ उपयोगी आहे.

गावाच्या सीमेवरील मोकळ्या जागेमध्ये आणि जंगलाजवळील वस्त्यांत किंवा शेतमळ्यात कोणतीही लागवड, मशागत किंवा खास देखभाल न करता नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या व वाढणारी ही फळे बहुगुणी असतात. रानफळांमधून आदिवासींना व जंगलातल्या प्राण्यांना शरीरास रानमेवा वाचेल. रानमेव्याचे औषधी गुणधर्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

याकरिता गावांबरोबरच शहरां- मध्येही आरोग्यवर्धन रानमेव्याची माहिती प्रसारित झाली पाहिजे. वृक्षलागवडीसारखे उपक्रम राबवताना, प्रामुख्याने प्रदेशनिष्ठ रानमेव्याचा विचार करून लागवडीस प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येते.

सातपुड्यातील रानमेवा : Ranmewa Bhokar from Satpura is Preferred By Consumers

आवश्यक असणारी जीवनसत्वे, प्रथिने, लोह व कॅल्शिअम मिळत असते. हिरव्या कच्चा भोकरांची भाजी करतात, तर पिकलेली पांढरी-पिवळी भोकरे नुसती खाल्ली जातात, भोकर खाण्यास चिकट असतात. सध्या भोकरांची झाडे कमी होत चालली आहेत.

Important Links : 

Related Notification Information Pdf : Click Here
Official Website Information Link :  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

 

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !