नवागांव (बुडकी) गावात 66 लोकांना रेशन कार्ड वाटप. |
नवागांव (बुडकी) गावात 66 लोकांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले….
शिरपुर :- तालुक्यातील नवागांव (बुडकी) या गावात मागिल काही वर्षांपासुन राहत असलेल्या 66 घरात रेशन कार्ड पासुन वंचित होते.
हे गावातील बन्सीलाल पावरा, जितेंद्र पावरा, अनिल पावरा यांना लक्षात येताच त्यांनी गावात सर्वे करुन मा. पंचायत समिती सदस्य विशाल पावरा व बोराडी चे भरत पावरा यांना हि बाब लक्षात घेऊन तातडीने विशाल पावरा व भरत पावरा तसेच गावातील रेशन कार्ड वंचिताना घेऊन तहसीलदार कार्यालय शिरपुर येथे जाऊन प्रत्येश चर्चा करुन निवदेन द्वारे एकुण 70 रेशन कार्ड ची मागणी केली होती त्याची प्रशासकीय अधिकारी वेळीच दखल घेऊन काही महिन्यांतच एकुण 70 कार्ड पैकी 66 रेशन कार्डाना मंजुरी देऊन मा.विशाल पावरा (पं.स.सदस्य शिरपुर) व भरत पावरा (तालुकाध्यक्ष बिरसा ब्रिगेड) यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व रेशन कार्ड धारकांना कार्ड चे वाटप करण्यात आले..
क्लिक करून वाचू शकता.
शिधापत्रिका देणेबाबत – शासन निर्णय.
जे लोक दिव्यांग असतील त्यांनी आपल्या तहसीलदार ऑफिस मध्ये भेट द्या.
यावेळी :- जितेंद्र पावरा, अनिल पावरा, बन्सीलाल पावरा, लक्षण पावरा (पो.पाटील), जयदास पावरा, राजेश पावरा (वाकपाडा), बाकलीबाई पावरा, तसेच गावातील महिला व गावकरी तसेच मोठय़ा संख्येने उपस्थित होते…
जितेंद्र पावरा (युवा कार्यकर्ता नवागांव)
Leave a Reply