अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर सरपंचांचा जातीचा दाखला अवैध : Sarpanch Yancha Jaticha Dakhla Tharla Avaidhya
ग्रामीण बातम्या : अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथील सरपंचांचा जातीचा दाखल अवैध ठरवण्यात आला आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीत झालेल्या सुनावणीदरम्यान सरपंचांचे जात प्रमाणपत्र वैध नसल्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. यामुळे पदावरून पायउतार होण्याची वेळ सरपंचावर येणार आहे.
अबेसिंग अमरसिंग पाडवी हे ऑक्टोबर २०२२ मध्ये रामपूर (ता. अक्कलकुवा) ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदावर विजयी झाले होते. दरम्यान अबेसिंग पाड़वी हे
गुजरात राज्यातील रहिवासी असल्याने त्यांच्याविरोधात जात पडताळणी समितीकडे अपील दाखल करण्यात आले होते. समितीने केलेल्या पडताळणीत अबेसिंग पाडवी यांनी दिलेले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र हे योग्य ठरत नसल्याचे समोर आले होते. अबेसिंग पाडवी हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसल्याने राज्यातील अनुसूचित जमातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र नसल्याचे समोर आल्याने समितीने त्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द केले.
तक्रारदारातर्फे अॅड. पी.आर. जोशी यांनी काम पाहिले Sarpanch Yancha Jaticha Dakhla Tharla Avaidhya
हेही वाचा :
सरपंचासह सहा सदस्यांचे शासकीय जागेवर अतिक्रमण : Sarpanch Sah Sadasya Che अतिक्रमण