Gramin Batmya

weather today Live

News

Sextortion Financial Cyber Crimes. | मुळे दोन मुलांनी आत्महत्या.

Sextortion_आणि_आत्महत्या  गेल्या चार दिवसात पुण्यात Sextortion मुळे दोन मुलांनी आत्महत्या केल्या. मी हा विषय काही दिवसांपूर्वीच वायझेडत्व आणि हनीमून_ट्रॅप या दोन लेखांमध्ये लिहिला होता.

Sextortion_Sextortion Financial Cyber Crimes. | मुळे दोन मुलांनी आत्महत्या.
Sextortion Financial Cyber Crimes. | मुळे दोन मुलांनी आत्महत्या. 

विषय कितीही सिरीयस असला तरी मी विनोदी अंगाने लिखाण करतो, त्यामुळे जास्त लोक ते वाचतात. माझ्या लिस्ट मधल्या काही लोकांनी माझे लेख वाचले पण अर्थात फेसबुकवरील लेख फारच थोड्या लोकांपर्यंत पोचतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे Sextortion बर्‍यापैकी Facebook वरुण चालतं त्यामुळे Facebook वरील लोकांनीच ह्यावर लिहिलं पाहिजे.

Sextortion मुळे लाखो-करोडो लोक रोज हेच उप्पट धंदे करत असतात. 

पण 2019 पासून महाराष्ट्रात जो राजकारणाचा चुथडा झालाय तेव्हापासुन इथले अनेक चांगले लेखक लेखक न राहता राजकीय च्युज्ञ झालेत. ते धेंडांळी लागलेल्या म्हैशीसारखे उठसूठ राजकीय पो टाकत असतात आणि ते ज्यांच्याविषयी लिहत असतात त्या राजकीय नेत्यांना हा लेखक अस्तित्त्वात आहे की नाही हे सुद्धा महिती नसतं, कारण ह्यांच्यासारखे लाखो-करोडो लोक रोज हेच उप्पट धंदे करत असतात. 

मुद्दा असा आहे की इथे आपल्या आयुष्यावर खऱ्या अर्थाने प्रभाव टाकणार्‍या गोष्टींवर लिहिणारे फेसबुकवर उरले नाहीत, पण आपण ज्यावर कितीही खरडलं तरी त्या गोष्टीवर शाटभर सुद्धा फरक पडणार नाही,

Sextortion फेसबुकवर पडून असतात. 

अशा गोष्टी लिहिणारे अनेक फेसबुकवर पडून असतात. जर हा Sextortion चा विषय फेसबुकवर बर्‍याच जणांनी लिहिला असता आणि त्या पोस्टी ह्या दोन मुलांपर्यंत पोचल्या असत्या तर आज ते जिवंत असते. माझ्या पोस्ट जरी त्यांच्यापर्यंत पोचल्या असत्या तरी ह्या आत्महत्या टळल्या असत्या.

Sextortion मुळे सूइसाइड.

धनकवडीच्या मुलाने जेव्हा Sextortion करणाऱ्या मुलीला सांगितलं की मी सूइसाइड करेल तेव्हा ती मुलगी म्हणाली की “करो सूइसाइड” आणि त्या मुलाने खरच आत्महत्या केली. इतका हा विषय गंभीर आहे. 

दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे Sextortion करणारे दुसर्‍या राज्यातील असतात आणि पोलिसांमध्ये Inter-state Coordination नसल्याने ते सापडत नाही.

Sextortion Financial Cyber Crimes.

Internet Banking आणि UPI आल्यापासून Financial Cyber Crimes खूप वाढलेत आणि त्यावर कार्यवाही करणारी सरकारी व्यवस्था Efficient नाही त्यामुळे अनेकांना लाखो रुपयांचा घोडा लागलाय.

Sextortion मुळे तर अनेक आत्महत्या.

Honey Trapping करून होणार्‍या Sextortion मुळे तर अनेक आत्महत्या होतायत. उद्या ह्या गोष्टी आपल्यावरही येऊ शकता तेव्हा आपण काय करणार? ह्यासाठी सरकारवर सोशल मीडिया वरुन दबाव आणने गरजेचे आहे, कारण News Media पार YZ झालाय. ते लोकांच्या समस्या मांडत तर नाहीच पण उलट आपल्या समस्या वाढवतात.

त्यामुळे इथे आपण दुसर्‍याने तयार केलेले Narrative रेटण्यापेक्षा आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते मांडलं पाहिजे. काल आत्महत्या केलेला मुलगा फक्त 19 वर्षांचा होता. इथे अनेकांची पोरं-पोरी ह्या वयाच्या आसपासचे असतिल आणि फेसबुक, Instagram नक्कीच वापरत असतिल त्यामुळे ही आपल्या घराशी निगडित समस्या आहे. ह्या कारणामुळे दुसर्‍यांची तळी उचलण्यापेक्षा स्वार्थी होणे कधीही चांगलं कारण निस्वार्थी लोकांची कायम लागलेली असते.

Sextortion मुळे कित्येक जणांचे जीव वाचू शकता. 

त्यामुळे स्वार्थी व्हा, सुखी व्हा आणि आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या मांडा कारण राजकीय चिऊताईगिरिला अंत नाही. सध्यातरी Sextortion वर लिहा. तुमच्यामुळे कित्येक जणांचे जीव वाचू शकता. आपल्याच घरादारातील मुलं ह्या गोष्टी पासून सावधान होतील. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातील तरुण मुलांशी, मित्रांशी ह्याविषयी संवाद साधा, ते बराच वेळ ऑनलाईन असल्याने अनेक Cyber गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहेत. 

vijubaba- Vijay Rahane.

link click here. 

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !