Shevgaon police crackdown on illegal businesses : शेवगाव पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई तालुक्यातील आव्हाणे बु.येथे गावठी दारूच्या अड्डयावर छापा ४४ हजार ५०० रुपये किमतीचे गावठी हातभट्टी तयार करण्याचे रसायन नष्ट !
या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव पोलिसांनी तालुक्यातील आव्हाणे बु. येथे गावठी दारूच्या अड्डयावर टाकलेल्या छाप्यात ४४ हजार ५०० रुपये किमतीचे गावठी हातभट्टी तयार करण्याचे रसायन जप्त करण्यात आले. तालुक्यातील आव्हाणे बु. येथील भिल्लवाडा वस्ती येथे गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळाली. नागरे यांनी पोलीस पथकाला सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकातील कर्मचाऱ्यांनी आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेतले. या वेळी आरोपींच्या कब्जातील ४४ हजार ५०० रुपये किंमतीचे गावठी हातभट्टी तयार करण्याचे रसायण जप्त करण्यात आले. याबाबत पोकाँ. भारत बाजीराव अंगारखे पत्रकार : इसाक शेख
व पोकाँ. संतोष हरिभाऊ वाघ यांच्या फिर्यादीवरू आरोपी गणेश छबुराव पवार (वय ४०), रा. भिल्लवाडा वस्ती आव्हाणे बु. ता. शेवगाव, विकास रामदास वाघमारे (वय ३२, रा. भिल्लवाडा वस्ती ता. शेवगाव यांच्यावर शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली शेवगावचे पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पो. स. ई. विशाल लहाणे, पोहेकाँ. किशोर काळे, पो.हे.काँ. चंद्रकांत कुसारे, पो.हे.काँ. परशुराम नाकाडे, पो.ना. आदिनाथ वामन, पो.का. शाम गुंजाळ, पो.काँ. बप्पासाहेब धाकतोडे, पोकाँ. संतोष वाघ, पो.काँ. प्रशांत आंधळे, पो.काँ. भारत अंगारखे, पो.काँ. आदिनाथ शिरसाठ, पो.काँ. राहुल आठरे यांनी केली. पुढील तपास पो.हे.काँ. नेताजी मरकड करत आहेत.
- अविनाश देशमुख शेवगांव : Shevgaon police crackdown on illegal businesses 2024
- सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार : Shevgaon police crackdown on illegal businesses 2024
Leave a Reply