Team inspection. |
शालेय पोषण चा दर्जा तपासणार भरारी पथकाची नियुक्ती अचानक देणार शाळांना भेटी.
शाळांमध्ये देण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहाराची आता भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियंत्रणाखाली भरारी पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. हे भरारी पथक अचानक शाळेला भेट देऊन शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी होते का याची पाहणी करणार आहे.
शालेय पोषण आहार योजनेमध्ये गैरव्यवहार केल्यास.
राज्यातील शाळांमधून शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप कमी करणे निकृष्ट प्रतीचा आहार मुलांना देणे आहाराचे वाटप न करणे योजनेमध्ये गैरव्यवहार करणे.
भरारी पथक नेमण्याचा निर्णय.
आधी स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत त्यामुळे शासनाने भरारी पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हास्तरावरील भरारी पथक कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषद मधील अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांची भरारी पथकामध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे.
शालेय पोषण आहार योजनेची तपासणी.
पथकामार्फत जिल्ह्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेची तपासणी करण्यात येणार आहे शाळा तपासणी चा कार्यक्रम गोपनीय ठेवण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिन्याला दहा शाळांची तपासणी होणार तीन दिवसाच्या आत अहवाल सादर करायचा आहे.
तर या शाळेत कार्यवाही होणार.
या शाळांमध्ये अंमलबजावणीमध्ये काय त्रुटी आहेत या शाळांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात येईल मात्र योजना राबविताना गैरव्यवहार होत असलेल्या आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.