Tribal Rights Day | आदिवासी अधिकार दिन |
आदिवासी भील समाज सेवा व बहुद्देशीय संस्थेमार्फत नामपूर परिसरात आदिवासी अधिकार दिन उत्साहात साजरा..!!
नामपूर(प्रतिनिधी)प्रविण पवार.
आदिवासी भील समाज सेवा व बहुद्देशीय संस्थेमार्फत तालुक्यातील नामपूर परिसरातील खामलोण, टेंबे या गावांमध्ये परिसरातील नामपूर, अंबासन, खामलोण, चिराई, टेंबे,तळवाडे,इत्यादी गावांमधील आदिवासी बांधव एकत्र येवुन संस्थेच्या माध्यमातून आदिवासी अधिकार दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन घेण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.प्रविण पवार सर यांनी आदिवासी बांधवांना संबोधित करताना सांगीतले की,संयुक्त राष्ट्र संघाने १३ सप्टेंबर २००७ रोजी ४६ कलमी आदिवासी अधिकार जाहीरनामा मंजूर करून युनोच्या आमसभेत प्रकाशित करण्यात आला. यात आदिवासींचे अधिकार, हक्क, संस्कृती,भाषा, परंपरा,चालीरीती,शिक्षण,मानवी हक्क,आदिवासींचे कायदे,जल,जंगल,जमीन वरील पारंपारिक अधिकार यांचे रक्षण, संरक्षण करणे,आदिवासी विषयक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे,आदिवासींशी विचारविनिमय करून उपाययोजना करणे, या विषयांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला.संयुक्त राष्ट्र संघाच्या (UNO)आमसभेत १९९३ पासून ९ ऑगस्ट ‘जागतिक आदिवासी दिन‘ व १३ सप्टेंबर २००७ पासून ‘जागतिक आदिवासी अधिकार दिन’ म्हूणन घोषित करण्यात आला.
जगातील आदिवासीपैकी २३ टक्के आदिवासी भारतात आहेत.परंतु,स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षानंतर मुळ मालकांचे हक्क,अधिकार यांची प्रभावी अंमलबजावणी होतांना दिसत नाही हे दुर्दैव आहे.अन्याय,अत्याचार,शोषण किती दिवस सहन करायचे? उपेक्षित जीवन किती दिवस जगायचे?याचा विचार करून आपले अधिकार,हक्कासाठी संघटित होणे गरजेचे आहे.आदिवासींनी सामाजिक उदासीनता सोडून आपली परंपरा,संस्कृती,यांचे रक्षणाबरोबरच आपले हक्क,अधिकारासाठी
आपापल्या स्तरावर आदिवासी अधिकार दिवस साजरा केला पाहिजे आणि आपल्या हक्क अधिकारांची जाणीव समाजाला करून दिली पाहिजे.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी मा.वंकर सोनवणे,बापु वाघ,राजु वाघ,गणेश पगारे,प्रभाकर सोनवणे,अनिल ठाकरे, योगेश जाधव,रामदास मोरे,शिवाजी माळी दावल सोनवणे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.