TSB Institute of Pharmaceutical College येथे आषाढी एकादशी उत्साहाने साजरी.
प्रतिनिधी, दि. १६ जुलै २०२४, शिरपूर: शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील हॉनेबल टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल (TSB Institute of Pharmaceutical College ) एज्युकेशन व रिसर्च महाविद्यालयात आषाढी एकादशी उत्साहाने साजरी. शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. या माध्यमातून वारकारी सांप्रदायिक महोत्सवाचे महत्त्व विशद केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रूख्मिनी, संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण परिसर भक्तीमय केला होता. विठ्ठल नामाच्या जपाबरोबरच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण विषयी जनजागृती केली.
वृक्षरोपण करून इतरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी पायी दिंडीतून जनजागृतीद्वारे विद्यार्थी मनावर संप्रदायीक बाबी प्रतिबिंबित करण्याचे कार्य दिंडी सोहळ्यातून शाळेने राबविले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. भाग्यलक्ष्मी बाविस्कर, संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धिरज बाविस्कर संचालिका सौ. मानसी बाविस्कर, प्राचार्य डॉ. तुषार साळुंके, प्रा. स्वप्नील पाटील, नम्रता माळी, नितीन पाटील, सुभरसिंघ राठोड, विशाल माळी, अतुल चौधरी, वैशाली पाटील, अर्चना वाडीले, धर्मजित पावरा, हेमंत बोरसे, जगन पावरा, कपिल पावरा, ईश्वर पावरा, गुड्डू पावरा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे या प्रसंगी उपस्थित होते.
हेही वाचा :
- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ; अभियान अंतर्गत ;माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.!
- Borgav |महाराष्ट्र शासन आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न.
- TSB Institute of Pharmaceutical College