फॉक्सकॉन कंपनी काय आहे?.
फॉक्सकॉन ही मूळ तैवान ची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही फॉर्च्युन ५०० च्या लिस्ट मध्ये २२ नंबरची कंपनी आहे . फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान उत्पादन व सेवा निर्माण करणारी कंपनी आहे.
फॉक्सकॉन ही मुख्यत्वे खूप जास्त विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करते. जसे अँपल साठी आय-पॅड, आय-फोन, आय-पॉड, अमेझॉन साठी किंडल, Nintendo गेमिंग टर्मिनल, नोकिया चे फोन, सोनी चे प्ले स्टेशन्स, गूगल साठी पिक्सेल चे फोन, मायक्रोसॉफ्ट साठी xbox चे गेमिंग सिस्टिम्स, ब्लॅकबेरी चा फोन, बहुतांश कॉम्पुटर मधले CPU सॉकेट्स हे फॉक्सकॉन चे असतात. अंदाजे, जगात वापरले जाणारे ५०% पेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे फॉक्सकॉन शिवाय उत्पादित होऊ शकत नाहीत.
फॉक्सकॉनचे आतापर्यंत चे मुख्य कामकाज हे तैवान व चीन मधल्या कंपन्यांमधून चालायचे. मागच्या काही वर्षात निर्माण झालेल्या अमेरिका-चीन जिओ-पोलिटिकल वादाच्या परिणाम स्वरूप फॉक्सकॉन सारख्या अनेक कंपन्या पुढचा विस्तार चीन च्या बाहेर करण्यास उत्सुक आहेत. चीन-तैवान मध्ये असलेला तणाव ही बराच कारणीभूत आहे.
Vedanta-Foxconn company |
फॉक्सकॉन स्वतः महाराष्ट्रात १.५४ लाख करोड रुपयांचा प्लांट टाकण्यास उत्सुक होती.
का उत्सुक होती?
१. महाराष्ट्र सरकार ने दिलेल्या प्रस्तावित तळेगाव च्या जागेत पाण्याची मुबलक उपलब्धता होती.
२. तळेगाव हे बेंगलोर-पुणे-मुंबई महामार्गावर आहे. इथे बेस्ट कनेक्टिव्हिटी होती.
३. महाराष्ट्रात skilled-labour म्हणजे कुशल कामगार मुबलक आहेत.
४. मुंबई अंतर राष्ट्रीय विमानतळ जवळच आहे. पुण्याचं विमानतळ ही आहे. JNPT पोर्ट म्हणजे बंदर खूप जवळ आहे.
५. या भागात शांत वातावरण आहे, गुन्हेगारी कमी आहे. सुरक्षित प्रदेश आहे.
६. फॉक्सकॉन कंपनी मुळे लाखो direct-indirect रोजगार जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा त्या कामगारांना पुणे-मुंबई सारखी शहरं राहायला जवळ आहेत.
तरीही ही कंपनी बळजबरीने गुजरात इथे ढोलेरा इथे हलवण्यात आली.
१. ढोलेरा मध्ये कुशल कामगार लवकर उपलब्ध होणार नाहीत. भारताच्या इतर भागातून त्यांना स्थलांतरित व्हावे लागेल.
२. ढोलेरा ला अजून तरी पुरेशी अंतर राष्ट्रीय कनेक्टिव्हिटी नाही.
३. प्रस्तावित ढोलेरा स्मार्ट सिटी सुरुवातीपासून वादात आहे. इथे कायम पाणी साठून राहणे, समुद्राचे पाणी जमिनीवर घुसणे इत्यादी अनेक प्रश्न आहेत. पर्यावरणाचे बरेचशे नियम धाब्यावर बसवून इथे बळजबरीने ढोलेरा स्मार्ट सिटी चा प्रोजेक्ट राबवला जातोय. यामुळे इथे लोक स्थलांतरित व्हायला कचरतात.
महाराष्ट्र आणि फॉक्सकॉन वेदांत मध्ये सगळे ठरले होते. असे नेमके काय झाले मागच्या एक दोन आठवड्यात कि हा प्रोजेक्ट अचानक गुजरात कडे वळला?
काही पत्रकारांच्या निरीक्षणानुसार ३१ ॲागस्ट ते ११ सप्टेंबर या गणपतीकाळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, किंवा एकही मंत्री मंत्रालयाकडे फिरकला नाही. सगळे गणपती मंडळांना भेटी देण्यात आणि राजकीय कुरघोड्यांमध्ये व्यस्थ होते. अन् तिकडे इतका मोठा महाप्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून गेला . आणि जबाबदार
मविआ धरताहेत ! महाराष्ट्रातील तरुणांनी
सरकारला याचा जाब विचारायला पाहीजे ?
Leave a Reply