Vir Bahadur Krantivir Khajya Naik : इंग्रजांचा कर्दनकाळ अजरामर विरबहादूर स्वातंत्र्य सेनानी योद्धा खाज्या नाईक स्मृतिदिवसानिमित्त बाटवापाडा ग्रामपंचायत शेमल्या येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न.!
विर बहादूर क्रांतीवीर खाज्या नाईक स्मृतिदिवस अभिवादन / Vir Bahadur Krantivir Khajya Naik
दिनांक : ११ एप्रिल २०२२ रोजी बाटवापाडा ग्रामपंचायत शेमल्या येथे इंग्रजांचा कर्दनकाळ अजरामर वीर बहादूर खाज्या नाईक यांच्या पवित्र तीर्थस्थान खाज्या नाईक यांची स्मृतिदिनानिमित्ताने खाज्या नाईक ट्रस्ट व परिसराततील समाज बांधवांकडून कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आला.
यावेळी वीर बहादूर खाज्या नाईक यांच्या पूर्ण इतिहासा वर संशोधन करणारे शहादा येथील श्री.डॉ.कांतीलाल टाटीया यांनी इतिहासात पूर्ण पणे समाजाला मारदर्शन केले तर यावेळी शिरपूर पंचायत समिती सभापती श्री.सत्तरसिंगदादा पावरा, धुळे जिल्हा प्रकल्प स्तरीय अध्यक्ष श्री.रमेशदादा वसावे, माजी समाज कल्याण सभापती श्री.वसंतदादा पावरा, जयसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे ऍड.दारासिंग पावरा, पंचक्रोशीतील सरपंच, पोलीस पाटील व स्ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी परिसरातील समाज बांधव यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.
ह्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री.डॉ.कांतिलाल टाटिया, पंचायत समिती सभापती श्री.सत्तरसिंग पावरा, जयसचे डॉ.हिरा पावरा ह्यांचे मार्गदर्शन व खाज्या नाईकांचा इतिहास उजाळला गेला व युवकांपुढील आव्हान संबोधण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरसा ब्रिगेडचे विभागाध्यक्ष तथा ट्रस्टचे उपाध्यक्ष सुंदरलाल पावरा यांनी केले तर आभार ट्रस्टचे सदस्य ऍड.बाजीराव पावरा यांनी मानले.
या शासकीय योजनांची माहिती वाचा : विहीर अनुदान योजना
Related Informational Post :
- Vir Bahadur Krantivir Khajya Naik History
- भील प्रदेश का नक्शा और जानकारी : Bhil Pradesh map
- क्रांतिवीर Tanya Mama Bhill यांचा महान इतिहास वाचा