Stefan Raharja football player was struck by lightning |
बाली (इंडोनेशिया) : फुटबॉलचा सामना सुरू असताना अचानक कोसळलेल्या विजेमुळे खेळाडूचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.
स्टेफन राहारजा असे या खेळाडूचे नाव आहे. सुभांग येथील तो राहाणारा होता. पश्चिम जावाजवळील बानडंग येथील सिलीवांगी स्टेडियममध्ये मैत्रीपूर्ण लढत खेळवली जात होती. खेळ रंगात आला असताना अचानक वीज कोसळली.
विजेचा लोळ स्टेफन राहारजा या खेळाडूवरच पडला. जबर जखमी झालेला खेळाडू श्वास घेत होता; परंतु रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडताच संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली. हवामान खराब असल्यास कुठलाही खेळ खेळवला जात नाही.
महत्त्वाचे म्हणजे हवामानाचा अंदाज सामन्यापूर्वीच मिळालेला असतो. परंतु, अंदाज मिळूनही त्याकडे डोळेझाक केल्याचा परिणाम इंडोनेशियाला भोगावा लागला. एक चांगला खेळाडू संघाने गमावला. ईस्ट जावाच्या बोजोनेगोरो येथे ‘यू-१३’ कपच्या खेळा दरम्यानही एका खेळाडूचा वीज कोसळल्याने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
Stefan Raharja football player was struck by lightning
ही घटना गतवर्षी घडली होती. २०२३ मध्ये ब्राझिल येथे अशाच पद्धतीने स्टेडियमवर खेळणाऱ्या खेळाडूंवर वीज कोसळली होती. यात खेळाडूचा मृत्यू ओढवला, तर सहा जण जखमी झाले होते.
You tube व्हिडिओ 👇🏻👇🏻👇🏻