घोरकलियुग “शाळा नाही, मग आम्हाला शेळ्या द्या..”
तालुका प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा काही दिवसांपूर्वी प्रशासनाने बंद केली आहे. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी विद्यार्थी आणि पालक शेळ्यांसह पायी चालत येऊन नाशिक जिल्हा परिषदेवर धडकले आहेत.
शाळा नाही, मग आम्हाला शेळ्या द्या..” |
दोन दिवसांपूर्वी वरील बातमी वाचनात आली.
प्रशासनाने शाळा बंद करण्याचा जो काही निर्णय घेतला तो कशाच्या आधारे??
ह्यांना हे जे अधिकार मिळालेत ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या शिक्षणानेच दिलेत ना?
प्रशासनास शिक्षणावरील खर्च जर खरच परवडत नसेल तर पांढरा हत्ती असलेल्या विधान परिषदेला बरखास्त करून त्यावरील खर्च जिल्हा परिषदेच्या शाळांवर करा, कारण इथे गोर गरीब, मजूर, कष्टकरी यांचीच मुलं शिकतात. तुम्ही जसे तुमच्या मुलांची लाखो रूपये फी भरून कॉन्व्हेंट मध्ये शिकविता तेवढी ऐपत गोरगरीब लोकांची नसती. तुम्हाला ततुमची मुलं नाही शिकवायची जिल्हा परिषदेच्या शाळेत तर नका शिकवू परंतु कमीत कमी गोरगरीब मुलांचा शिक्षणाचा अधिकार हिसकावून का घेत आहे ??
सोशल मिडीयावर दिवसरात्र पोस्ट करणा-या कार्यकर्त्यांनो तेच शिक्षण जेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर पुढच्या पिढीपासुन काढून घेतले जातेय तेव्हा जर तुम्ही आम्ही शांत राहीलो तर अधिकारांच्या गोष्ट बोलायचा अधिकार आपल्याला राहात नाही . नेत्यांची जरा कमी चाटा मग तो शिवसना , काँग्रेस, राष्ट्रवादी , भाजप वा इतर कोणत्याही पक्षाचा कोणी का असेना पण हक्काच्या शिक्षणासाठी पेटून उठा नाही तर तुमचे भविष्य सांगायला तुम्हाला ज्योतिषाची गरज पडणार नाही ते अंधारात आहे हे मी आता सांगतो.