क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या स्मृतिस्थळी जाण्यासाठी ना रस्ता बनला नाही स्मारक झाले.
ग्रामीण बातम्या प्रतिनिधी : शिरपूर उत्तर महाराष्ट्रातील पराक्रमी, आंबापाणी युद्धाचे शूरवीर खाज्या नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुक्याच्या दुर्गम भागातील बाटवापाडा येथे 11 एप्रिल रोजी आमदार काशिराम पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत शौर्यदिवस साजरा करण्यात आला. मात्र आज देखील त्या गावाला जाण्यासाठी ना रस्ता बनला नाही, खाज्यांचे स्मारक झाले. खाज्या नाईकांचे नाव केवळ राजकारण आणि आर्थिक स्वार्थासाठीच वापरले जात असल्याचे सद्यस्थिती सांगते.
इंग्रज दप्तरी नोंद असलेल्या आंबापाणी युद्धाचे पराक्रमी शूरवीर खाज्या नाईक यांचा स्मुृतिदिन 11 एप्रील रोजी दरवर्षी साजरा केला जातो. तसा यावर्षीही साजरा झाला. मात्र 2014 पासून या ऐतिहासिक स्थळाला विशेष महत्त्व वाढले. या ठिकाणी मागील 6 -7 वर्षापासून बाटवापाडा रस्ता बनवून देणार, क्रांतिवीर खाज्या नाईक यांचे कोटी रूपयांचे स्मारक बनवून देणार आदी घोषणा केल्या जातात.
या शासकीय योजनेचा लाभ घ्या : MAHA dbt शेतकरी योजना
मात्र आजही बाटवापाडा गावाला प्रतिक्षा आहे ती रस्त्याची आणि वीर पुरूषाच्या स्मारकाची. तेथे जाणारा रस्ता म्हणजे देशातील प्रमुख खडतर रस्त्यांपैकी एक असल्याची प्रचिती येते. गरोदर महिला, वृद्ध नागरिक यांच्यासाठी तर तारेवरची कसरतच आहे.
याहीवेळी आमदार काशिराम पावरा यांनी भाषणातून रस्ता बनवण्याचे शब्द दिले. अन रस्त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचेही आश्वासन दिले. मग नेहमीच सत्तेत असणारे नेते करतात तरी काय? असा यक्षप्रश्न बाटवापाडावासियांना नेहमीचाच आहे.
हेही वाचा :
Leave a Reply