ग्रामपंचायतीची कामे व त्यासाठी आलेला निधि असा पाहा इथे |E-gram swaraj app. |
आज आपण ग्रामपंचायतला जमा झालेला ग्रामनिधी व शासनाकडून आलेला निधी व त्या निधीतून झालेली कामे ही सोप्या पद्धतीने कशी क्रॉस चेक करता येइल याविषयी माहिती पाहणार आहोत.
प्रत्येक ग्रामपंचायतला दरवर्षी वित्त आयोगाच्या निधीसाठी शासनाला कृती आराखडा तयार करून पाठवायचा असतो, कृती आराखडा म्हणजे येणाऱ्या आर्थिक वर्षात त्या गावात कोणकोणती कामे करावयाची आहे व त्या कामासाठी अंदाजे किती निधी लागणार आहे.
हा कृती आराखडा व ग्रामपंचायतचे सर्व जमा खर्चाचे Voucher ची entry ग्रामसेवक Computer oprater च्या साहाय्याने Online शासनाच्या E-gram swaraj या portal वर upload करत असतो.
E-gram swaraj app या मध्ये आपल्याला सामान्य फंड, वित्त आयोगाचा निधी तसेच ग्रामपंचायतमध्ये राबविण्यात येणाऱ्या इतर योजनांची माहिती सहज प्राप्त होइल.
सामान्य फंडात जमा झालेला निधी व त्यामध्ये दाखविण्यात येणारा खर्च हा खरोखरच आपल्या गावात होत आहे काय ?
त्या app मधे हेच चेक करायचे आहे कि कृती आराखडयानुसार जर निधी मंजूर झालेला आहे तर ती सर्व कामे गावात झालेली आहे कि नाही.
E-gram swaraj मध्ये Total works म्हणजे कृती आराखडा जो ग्रामपंचायत शासनाला सादर करते गावातील विकासकामे करण्यासाठी.
Fund allocated to G.P. म्हणजे त्या कृती आराखड्यासाठी मंजूर झालेला निधी.
आता निधी आला कि नाही ते आपल्याला Finanacial progress मधे Receipt मधे पाहता येइल व तो निधी खर्च झाला कि नाही व कोणत्या कामावर खर्च झाला ते Exependiture मधे पाहता येइल.
१) निधी आला व खर्च पण दाखवित आहे तर ते काम तेवढ्या निधीचे झालेले आहे किंवा नाही ते बघायचे असते.
२) निधी आला खर्च दाखविण्यात आला परंतु गावात काम दिसत नाही तर त्याची तक्रार करून चौकशी व्हायला पाहिजे.
३) निधी आला व काम झाले नाही व खर्च ही झाले नाही तर असे का झाले याचे उत्तर सुद्धा ग्रामपंचायतला विचारायला पाहिजे.
शक्यता……
कृती आराखड्यात दाखविण्यात आलेले काम नाही झाले, काम झाले परंतु दाखविण्यात आलेल्या खर्चानूसार कामाची गुणवत्ता नाही किंवा कामासाठी दाखविण्यात आलेल्या खर्चाच्या हिशोबाने काम खुपच कमी दिसत असेल.
उदाहरणार्थ….
१) गावातील सिमेंट रस्ते
२) नाली बांधकाम
३) RO Plant
४) शाळेचे अंगणवाडीचे सौंदर्यीकरन
५) अंगणवाडीला दरवर्षी पुरविण्यात येणारे साहित्य, फर्निचर, खेळणी, साउंड सिस्टीम
६) नालीसफाई साठी ग्रामसेवक अवाढव्य रकमा दाखवितो
७) पाण्याच्या टाकी सफाईसाठी (Iron bleaching)
८) समाज मंदिराचे बांधकाम
९) स्मशानभूमीच्या कामासाठी येणारा निधी
असे अजून बरेचसे खर्च दाखविण्यात येतात.
कोणत्याही कामात जर तुम्हाला अनियमितता दिसत असेल तर तुम्ही (उदाहरणार्थ २०१५ ते २०२०) या आर्थिक वर्षाची चौकशीची मागणी करु शकता.
तुम्ही गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे चौकशी साठी तक्रार अर्ज करु शकता.
तक्रार अर्जाची झेरॉक्स काढून त्यावर नेहमी रिसिव्हींग घेणे आवश्यक आहे. (पोच पावती/त्या कार्यालयाचा सही व शिक्का).
गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना तक्रार अर्ज दिल्यानंतर कारवाई होत नसेल तर परत एका महिन्यानंतर स्मरण पत्र द्या.
त्यानंतर ही जर गटविकास अधिकारी कारवाई करत नसेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कडे तक्रार अर्ज करावा, अर्जासोबत गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रार अर्जाची व स्मरण पत्राची प्रत जोडावी.
झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी अवश्य होइल, फक्त पाठपुरावा सतत करत रहावा लागेल.
ग्रामपंचायत कारभाराविषयी व योजनांबाबत जनसामान्यांची जनजागृती करणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक नावावर क्लीक करून बघा.
E-gram swaraj app Link
Leave a Reply