वर्षानुवर्षेपासून सुरू असलेले आदिवासी समाजातील #माऊली_माता_पूजन.!.
ओखात्री (अक्षय तृतीया) ह्या महिन्याच्या पर्वात आदिवासी भागात माऊली मातेचं पूजन गावोगावी होत असत.
ओखात्री महिन्यातील चार मंगळवार पैकी एक मंगळवार गावातील वरिष्ठ बसून माऊली माता पूजनासाठी ठरवतात.
माऊली माता हि निसर्गाची प्रकृती माता देवी आहे, ती लोकांच्या स्वास्थ्याची रक्षण करते, गावोगावी रोगराई पसरू नये म्हणून गावातले लोक माऊली मातेची मानता करतात, ती पूर्ण करण्यासाठी गावाशेजारी एका झाडाखाली एक पूजा करतात, बकरा मारून त्याची हिस्से वाटणी करतात आणि प्रत्येक परिवार त्या झाडाखाली अथवा घराबाहेर ते अन्न बनवून त्याचा आस्वाद घेतात.!
#धावपळीच्या ह्या सध्याच्या दुनियेत सर्व जगात धावपळ आहे आपण सर्वांनी प्रकृती मातेची माऊली मातेची पूजा करून ह्या लोकांच्या अनेक संकटातून सर्व जगाला मुक्त करण्यासाठी प्रार्थना करुया.
आपलाच_#डॉ_हिरा_पावरा*