अनेमिया फ्री इंडिया फोरम आरोग्य आणि सेंद्रीय पोषण परसबाग निर्मिती चे प्रशिक्षण संपन्न. |
बारीपाडा येथे आरोग्य आणि सेंद्रीय पोषण परसबाग निर्मिती चे प्रशिक्षण संपन्न.
खोकरविहीर :-दि.22.09.2022 धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील पर्यावरण अभ्यास केंद्रात नुकतेच दिनांक 16,17 व 18 सप्टेंबर रोजी 3 दिवसीय निवासी आरोग्य आणि सेंद्रीय पोषण परसबाग निर्मिती चे प्रशिक्षण संपन्न झाले.
अनेमिया फ्री इंडिया फोरम हे भारतातील 8 राज्यात कार्यरत असलेले 410 सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. सेंद्रीय तसेच पोषण रहित परसबाग निर्मितीतून वैविध्यपूर्ण पालेभाज्यांचा आहारात समावेश केल्याने पोषणाच्या कमतरते मुळे होणाऱ्या अनेमियावर सहज मात करता येते.
नेमक्या ह्याचं विषयावर हे प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले गेलेले होतें. सहायक ट्रस्ट हीं जी अनेमिया इंडिया फोरम मध्ये माहिती आणि प्रशिक्षण भागीदार म्हणून कार्य करते आहे.
त्यांच्या मार्फत कार्यक्रम समन्वयक प्रमोद शिंदे, वरिष्ठ प्रशिक्षक आतिष गायकवाड, प्रशिक्षण समन्वयक रीचा नौला, कार्यक्रम समन्वयक पियुष सोनी यांनी आरोग्य, पोषण, अनेमिया आणि सेंद्रीय पोषण परसबाग निर्मिती या विषयावर मार्गदर्शन केले तर सहायक ट्रस्ट चे संचालक राजेश के. आर यांनी शेवटच्या दिवशी सर्व सहभागी प्रशिक्षकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण शिबिरात जीवामृत, बीजामृत, जैविक कीटकनाशके बनविणे तसेच प्रशिक्षक बनण्यासाठी आवाज आणि भाषेचा उपयोग, समाधीटपणा, तसेच आवश्यक वेशभूषा यावर प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणास महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातून 21 सामाजिक आणि शैक्षणिक संस्थामधून 30 प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यात खांदेशातून 8 मराठवाड्यातून 8 कोकणातून 3 विदर्भातून 1 तसेच पश्चिम महाराष्ट्रातून 1 संस्थेने सहभाग घेतला होता.
नाशिक जिल्ह्यातील बिलिफ्स या संस्थेच्या दोन कार्यकर्त्यांनी यात सहभागी होत पेठ, त्र्यम्बक व सुरगाणा या तालुक्यासाठी ऍनिमिया फ्री तालुका ही संकल्पना मांडून त्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला.
Leave a Reply