शासनाचा निर्णय : ई-शिधापत्रिका काढून घ्या ! जिल्हा पुरवठा विभागाचे आवाहन. नागरिकांनो… कागदी रेशनकार्ड देणे बंद, आता मिळणार ई-शिधापत्रिका.
शिवाजी कदम : कागदी रेशनकार्ड वाटप करणे आता बंद झालेले आहे. यामुळे नवीन ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने ई. शिधापत्रिका काढावी लागणार आहे. जुन्या ग्राहकांनादेखील ई-शिधापत्रिका काढण्याची सोय पुरवठा विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून. ई-शिधापत्रिका
कमी दरामध्ये अन्न उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी कागदी शिधापत्रिकेचा वापर करण्यात येत होता. यावर्षी मे महिन्यापासून सरकारने कागदी रेशनकार्ड ऐवजी ई. शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला. टप्प्याटप्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ई-शिधापत्रिका देण्याचे काम सुरू आहे.
तीन महिन्यांत पुरवठा विभागाकडे ज्या शिल्लक असलेल्या कागदी शिधापत्रिका आहेत. त्या वितरित करण्यात आल्या आहेत. आता पुरवठा विभागाने कागदी शिधापत्रिका देणे पूर्णपणे बंद केले असून, ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने ई. शिधापत्रिका काढणे बंधनकारक केले आहे. यामुळे शिधापत्रिकेच्या नावाखाली चालणान्या गोधळाला लगाम लावणे शक्य होणार आहे. ग्राहकांना कागदी रेशनकार्ड जपून ठेवण्याची गरज उरलेली नाही. जुन्या ग्राहकांना देखील ई. शिधापत्रिका डाऊनलोड करता येणार आहे.
ऑनलाइन प्रणाली सुरु.
तीन महिन्यापासून पुरवठा विभागाकडून ई शिधापत्रिका देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी सीएससी सेंटर ऑनलाइन सेंटरचालकांना सूचना दिलेल्या आहेत. तेथून देखील ग्राहक ई शिधापत्रिका डाऊनलोड करू शकतील. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. सविता चौधरी जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना.
अशी करा ई शिधापत्रिका डाऊनलोड.
ई शिधापत्रिकेसाठी https://rems.mahafood.gov.in/ या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अजांची तपासणी अधिकायाकडून करण्यात येईल. यानंतर योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना संकेतस्थळावरूनच ई शिधापत्रिका डाऊनलोड करता येईल.
ऑनलाइन करा अर्ज ।
नागरिकांना आता नवीन शिधापत्रिका मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. ई शिधापत्रिकेसाठी अर्ज केल्यानंतर अगदी काही दिवसामध्ये नागरिकांना ही शिधापत्रिका डाऊनलोड करता येणार आहे.
नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे, नाव दुरुस्ती, पत्ता बदल, नाव वाढविणे किंवा कमी करणे इत्यादी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंत्योदय, प्राधान्य कुटुंबयोजना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएन शेतकरी असा सर्व शिधापत्रिकाधारकाना ऑनलाइन सेवेद्वारे ई शिधापत्रिका मोफत मिळणार आहे.
अर्जदाराने ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांची तपासणी होऊन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई शिधापत्रिका उपलब्ध होईल.
Read More :
- स्वस्त धान्य दुकानात माल ठेवायला जागा शिल्लक नाही.
- स्वस्त धान्य दुकानात मिळेल धान्य एवजी पैसे.Cash-instead-of-grain-in-cheap-grain-store.
- स्वस्त धान्य दुकानदाराच्या दक्षता समितीची फक्त नावालाच.
- रेशनचे धान्य आता घरपोच मिळणार,केंद्र सरकारचा मोठा निर्णय..
ई शिधापत्रिका केंव्हा चालू होईल ? अधिक माहितीसाठी.
ई शिधापत्रिका 2024 . : आपल्याला ” ई शिधापत्रिका ” या योजनेच्या विषयी अधिक माहिती किंवा अर्ज कसे अर्ज करायचे आहे, याची माहिती मिळविण्यासाठी आपल्याला आमच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. लिंक आपल्याला ‘ ई शिधापत्रिका ‘ लाभार्थी व्हायचं असल्यास हि योजना चालू झाल्यास आम्ही आमच्या सोसीअल मेडिया ला शेअर करत असतो. आपणास लाभ घ्यावयाचा असल्यास आजच आमच्या Facebook Page आणि Telegram गृप ला जॉईन व्हा. ई शिधापत्रिका ‘ या महिन्यात चालू झाल्यास लगेच अधिकृत संकेतस्थळ प्रसिद्ध करू अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध देखील करून देऊ .
Important Scheme Link
- You Tube Channel Link
- WhatsApp Channel Link
- Instagram Channel Link