ऐकावं ते नवलच; गावात ना दारूचं दुकान ना चहाची टपरी!
आष्टी तालुक्यातील करंजी गावाची होतेय सर्वत्र चर्चा
कडा गाव असो की वाडी वस्ती तिथे गुटख्यापासून दारूपर्यंत सगळेच अड्डे असतात. अनेक तरुण गुटख्याच्या पिचकान्या मारत, तर दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेले तर नशेत झिंगताना दिसतात. मात्र याला अपवाद ठरत आहे ते करंजी गाव, येथे ना दारूचं दुकान ना चहाची टपरी अख्खं गाव निर्व्यसनी असल्याने या गावाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
नातेसंबंध असल्याने वादाचा विषयच नाही.
■ गावात आजबे आणि चौधरी असे दोन्ही मध्ये नातेसंबंध आहेत. विवाहदेखील नातेसंबंधात गावातच होतात.
■ त्यामुळे जुन्या लोकांच्या विचाराचा पगडा असलेल्या गावात आजवर कधीच
लहान वा मोठ्या कसल्याच वादाचा विषयच पुढे येत नाही.
आमच्या गावात एकोपा आणि वयोवृद्ध लोकांचा आदर त्याच बरोबर नातेसंबंध असल्याने कोणीच व्यसनाच्या नादाला जात नाही.
■ गावात ना दारूचं दुकान की गुटखा, मावा, चहाची टपरी देखील नसल्याने गुण्यागोविदाने नांदणारे गाव आहे.
समाजाने आदर्श घ्यावा, असे आवाहन येथील सरपंच भरत आजबे यांनी केले आहे.
बीड-नगर राष्ट्रीय महामार्गापासून अडीच तर आष्टी शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेलं आष्टी तालुक्यातील करंजी हे ६५० लोकसंख्या असलेलं खेडेगाव. पूर्वीपासून गावात कोणालाच कसलेही व्यसन नसल्याने व शेती, दुग्ध व्यवसाय, फळबाग शेती, आणि बाहेर गावी उद्योग व्यवसायासाठी जात
असलेले तरुण यामुळे कोणाला कसलीच सवड आपल्या कामातून मिळत नाही.
एवढेच काय पण गावात जर कोणाला एखाद्याचं घर विचारायचे असेल तरी देखील मोकार बसलेला तरुण दिसणार नाही. काम आणि कामच समोर ठेवून सवय लागलेल्या आहे.
या गावात कुठेच दारूचं दुकान नाही की साधी गुटखा, मावा चहाची टपरी नाही. त्यामुळे व्यसनाची आवड नसल्याने गावात व्यसनाचे साधन येणार कुठून? त्यामुळे खूप वर्षांपासून निव्र्व्यसनी असलेल्या या गावाची आता सर्वत्र चर्चा होत असल्याचे दिसून येत.
हा लेख वाचा : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ची संपूर्ण माहिती
Leave a Reply