विभागीय कृषि सह संचालक (सर्व) जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (सर्व) सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत संयुक्त खातेदारांचे ना हरकत पत्र अफिडेविट स्वरूपात घेणेबाबत.
खलील शासन निर्णय नुसार कापूस व सोयाबीन सामाईक यादी मधील शेतकरी बांधवांनी अफिडेविड करून फॉर्म पुन्हा जमा करा. कृषी सहाय्यक यांच्या कडे
- संदर्भ:- कृषि व पदुम विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई १. शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२४/प्र.क्र.४५/४-जे, दि. २९ जुलै, २०२४.
- २. शासन निर्णय क्रमांक: पीएफएम-२०२४/प्र.क्र.६१ (भाग-२)/२-जे, दि. १४ ऑगस्ट, २०२४.
- 3. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.४५/४-जे, दि. ३० ऑगस्ट, २०२४.
- ४. शासन निर्णय क्रमांक. पुरक-२०२४/प्र.क्र.६२/४-जे, दि. ३ सप्टेंबर, २०२४.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य द्यावयाचे आहे. याकरिता संयुक्त खातेदारांनी ना हरकत प्रमाणपत्र संबंधित कृषि सहाय्यकांकडे जमा करावयाचे आहे. यामध्ये ना हरकत प्रमाणपत्रावर काही खातेदार हे इतर सह हिस्सेदार यांच्या सह्या स्वतःहून करत असल्याचे क्षेत्रीय पातळीवरुन वारंवार कळविण्यात आले आहे.
तसेच अनेक ठिकाणी एकापेक्षा अधिक खातेदार हे सर्वांचे संमती पत्र आणून देत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे. त्यामुळे नक्की कोणाच्या खात्यावर संयुक्त खात्याची मदतीची रक्कम जमा करायची याबाबत प्रा निर्माण होऊ लागला आहे.
त्यानुषंगाने, संयुक्त खातेदारांच्या बाबत मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात येत असलेल्या मदत्तीच्या अनुषंगाने त्यांच्यापैकी एका सह हिस्सेदार यांचे नावावर मदतीची सर्व रक्कम जमा करताना अफिडेविट (Affidavit) घेतले जाते, त्या नुसार कापूस व सोयाबीन मदतीची रक्कम जमा करण्यासाठी इतर सर्व हिस्सेदार यांचे ना हरकत प्रमाणपत्र “अफिडेविट” (Affidavit) स्वरूपात घेण्यात यावे.
सदर संयुक्त खातेदार पैकी ज्याच्या नावावर रक्कम जमा करायची आहे, त्याने सदर अफिडेविट व त्यासोबत आधार संमती पत्र हे कृषी विभागाकडे मदत मिळण्यासाठी सादर करावयाचे आहे. या ना हरकत प्रमाणपत्र बाबतची सर्व जबाबदारी ज्याच्या नावावर लाभ जमा केला जाणार आहे त्या सह हिस्सेदार यांची राहणार आहे, तरी वरील प्रमाणे कार्यवाहीबाबत आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांना सूचित करण्यात यावे.
खलील योजना आहे सुरु.
Leave a Reply