युरिया खत खरेदी करत असतानां अनेक ठिकाणी लिंकिंग चा आग्रह धरला जातो.
जळगाव जा. :- शेतकऱ्यांनी खते व कीटकनाशके खरेदी करण्यासाठी लगबग सुरू केली. त्यातच रासायनिक खत उत्पादक कंपन्या व काही खत विक्रेते हे जबरदस्तीने लिंकिंग करून शेतकऱ्यांना लागत नसलेले उत्पादने गरज नसतानाही शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याची तक्रार अनेक वेळा जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी करत आहे.
अनेक शेतकरी युरिया खत मागत असताना काही कृषी केंद्र चालकांकडे खताचा स्टॉक असताना युरिया खत देत नाहीत. तर काही ठिकाणी लिंकिंग खताचा आग्रह धरला जातो तरच युरिया उपलब्ध करून देतो असे कृषी केंद्र चालकाकडून सांगितले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना गरज नसतानां मोठा नाहकत्रास सहन करावा लागतो.
यावर आळा घालण्यासाठी दिनांक २६/७/२०२३ ला गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे यांनी सर्व खत उत्पादक विक्रेते यांना रासायनिक खतांवरील लिंकिंग न करण्याबाबत पत्र सुद्धा काढलेले आहे.
तरीसुद्धा काही ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रकरणे तालुक्यात होत आहे. ही बाब लक्षात घेता युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद डि.पि.वाकोडे साहेब यांना भेटून आपण यामध्ये तातडीने लक्ष दिले पाहिजे असे सांगितले.
यावेळी तालुक्यातील अशपाक देशमुख, अजय गिरी व इतर शेतकरी उपस्थित होते.
Leave a Reply