थापटी तांड्यावरील अंगणवाडी सेविका निलंबित.
![]() |
ग्रामीण बातम्या पाचोड : थापटी तांडा (ता. पैठण) येथील अंगणवाडीला महिला बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल यांनी बुधवारी (दि. ५) सकाळी ९ वाजेदरम्यान अचानक भेट दिली. यावेळी अंगणवाडी सेविका छाया काळूसाहेब राठोड गैरहजर असल्याचे दिसून आल्याने त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले.
महिला बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल बुधवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरहून बीडमध्ये एका महिला मेळाव्यासाठी जात होत्या. यावेळी त्यांनी धुळे _ सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या थापटी तांडा येथे अचानक भेट दिली असता अंगणवाडी केंद्र बंद दिसले. चौकशीत अंगणवाडी सेविका छाया राठोड गैरहजर आढळून आल्या. अंगणवाडी कार्यक्षेत्रात राहणे आवश्यक असताना त्या शहरात राहतात.
महिला बालविकास आयुक्तांनी केलेल्या पाहणीत बंद दिसून आलेली अंगणवाडी.
असल्याचे निदर्शनास आले. यापूर्वीही त्यांना बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस देऊनही त्यांच्या कामकाजात कुठलीही सुधारणा झालेली नाही. यामुळे त्यांना महिला बालविकास आयुक्त अग्रवाल यांनी सेवेतून तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.