ग्रामपंचायत च्या नागरिकांना कैलास गवळी यांचे आव्हान. |
विनम्र आव्हान.
मतदार संघातील सर्व ग्राम पंचायत यांनी पक्ष, गट तट बाजूला करून गावाच्या विकासासाठी चांगल्या योजना राबवाव्यात.
1.मराठी शाळा इमारत सुसज्ज करावे.भौतिक सुविधा , आवश्यक शिक्षक मागणी. गावातील मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळण्यासाठी चर्चा,नियोजन. उपक्रम राबविणे आवश्यक.
2.गावातील रस्ते नियोजन व व्यवस्थापन.
3.गावातील लोकांसाठी पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाण्याची उत्तम व्यवस्था करणे.
4.गावात एक चांगले वाचनालय.
5.शाळेत संगणक व्यवस्था.
6.शाळेत खेळाचे साहित्य.वाचनालय, खेळाचे मैदान, बाग विकास करणे.वाचन कट्टा निर्माण करणे.
7.गावात समाज मंदिर उभारणे.त्या ठिकाणी गावाचा सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक आर्थिक ,व्यवसायिक विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे.
8.गटार व्यवस्था करणे. म्हणजे गावातील सांडपाणी व्यवस्थापन.पाण्याचा पुनर्वापर करणे.
9.वृक्ष लागवड,संरक्षण
10.व्यवसाय,नोकरी मार्गदर्शन ,रोजगार मार्गदर्शन शिबिर किमान 2 महिन्यातून भरवणे.
11.गरजवंतासाठी सक्षम घरकुल, आवास योजना राबविणे.
12.शेती विकासासाठी पाणी पुरवठा,बियाणे,खते अवजारे,वीज,शेती तंत्रज्ञान शिबिर व उपलब्ध करून देणे.
13.बेरोजगार लोकासाठी विविध योजना राबविणे.
14.आरोग्य सेवा सक्षम करणे.
15.बालके,महिला,वृध्द ,विधवा दिव्यांग विकास योजना,संरक्षण मार्गदर्शन योजना राबविणे.
16.शेती,शिक्षण,नोकरी,व्यवसाय यासाठी लागणारे कागदपत्र काढण्याच्या साठी अधून मधून मार्गदर्शन.
17.ज्येष्ठ नागरिक, विधवा साठी पेन्शन योजना.
18.सांस्कृतिक विकास.
19.दारूबंदी,व्यसन मुक्ती कार्यक्रम राबविणे.
20.शिक्षत तरुण तरुणी साठी आवश्यक व्यवसाय नोकर भरती मार्गदर्शन शिबिर.
21. शेत रस्ता विकास..
22.पाणलोट विकास कार्यक्रम राबविणे.
23.पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबविणे.
24.जंगल उत्पादने,शेती उत्पादने,खनिज उत्पादने विकास.
25.विविध बचतगट,आर्थिक बचत शिबिर,
26.लोकशाही पोषक वातावरण निर्माण करणे. राज्यघटना, पेसा कायदा,शिक्षण कायदा,माहितीचा अधिकार, रस्ता सुरक्षा ,महिला बालक सुरक्षा कायदा चर्चा सत्र,शिबिर आयोजित करणे.
26.खेळ स्पर्धा,
27.गुणवंत विद्यार्थी,गुणवंत कलाकार प्रोत्साहन,सत्कार, . एकट्याने अथवा एकीने होईल ..आपला गाव,आपला शहर विकास आपणच करूया…..असे खूप काही. कैलास गवळी