ग्राम पंचायत ने स्टिंग किया बैन.| Grampanchayat Sting Banned.
सरपंच, ग्राम पंचायत नवे पारगांव ता. लातकणंगले, जि. कोल्हापूर नोटीस:-
ग्रामपंचायत नवे पारगाव मार्फत गावातील सर्व दुकानदार बंधुना कळविणेत येते कि दुकानामध्ये विक्रीसाठी असणाया थंड पेयामध्ये कॅफिन वापरलेले अनेक थंडपेय आहेत कि जसे, “स्टिंग, फ्रेश एनजी चार्ज” वगैरे अश्या प्रकारच्या अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत. गांवामध्ये १८ वर्षा खालील लहान मुलांच्यामध्ये अशाप्रकारचे थंड पेय पिण्याचे प्रमाण आढळून आले आहे. तरी अशा कॅफिनयुक्त थंड पेयापासून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
यासर्व गोष्टीचा विचार करून अशा पेयापासुन लहान मुलांच्या आरोग्यास निर्माण होणारा धोका व तरूणांच्या वाढणाया व्यसनाधिनता या गोष्टीना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामसभेच्या ऐनवेळच्या विषयामध्ये अशा थंड पेयाच्या विक्रीवर बंदीचा ठराव झाला असुन अशा प्रकारच्या कोणत्याही थंड पेयांची आपल्या गांवामध्ये विकी करू नये. तसेच या प्रकारच्या थंडपेयाची जाहीरात आपल्या दुकानासमोर करू नये.
“ग्रामपंचायत, नवे पारगांव” ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, ISO 9001 नामांकन प्राप्त, स्थापना, दिनांक ३१/०१/१९७३.
● व्यसनमुक्ती गांव म्हणजे प्रगत गांव.
● जन्म व मृत्युनोंद २१ दिवसांचे आत ग्रा. पं. कार्यालयात करा.
● आपला परिसर स्वच्छ ठेवा / आपले आरोग्य आपल्या हाती.
● आडाणी बाप डोक्याला ताप, आडाणी आई घर वाया जाई.
● घरफाळा व पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करा.
● परोपरी वैयक्तिक शौचालय बांधा.
● पाणी जपून वापरा / बालविवाह टाळा.
● एडस् म्हणजे मृत्यू / कुटुंब लहान सुख महान,
● तंटा मुक्त गांव.
● पाणी उकळून व गाळून पिणे आरोग्यास हितकारक.
● हागणदारी मुक्त गांव.
तरी अशी कॅफिनयुक्त थंडपेये विक्री करताना निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. याची सर्व दुकानदार बंधुनी नोंद घ्यावी.
Leave a Reply