ठाकर_बांधवांची_दिवाळी_झाली_गोड….
दिवाळीच्या निमित्ताने “आर्ट ऑफ लिव्हींग” पिंपरी चिंचवड,पुणे येथील ग्रुपच्या माध्यमातून आदर्श गाव खामगाव येथे मांगणेवाडी मधील ठाकर वस्ती मध्ये १२५+ कुटुंबांना किराणा किट,दिवाळी फराळ किट, साड्या-ब्लँकेट-ड्रेस तसेच वैद्यकीय गोळ्या-औषधांचे वाटप आज करण्यात आले.
ठाकर_बांधवांची_दिवाळी_झाली_गोड |
अतिवृष्टी-ओल्या दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी बांधव संकटात असल्याने दिवाळीला सद्या कुठलाच उत्साह नसल्याचे चित्र आपण टिव्ही,पेपर तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहतोय,वाचतोय तसेच अनुभवतोय.
पण गेल्या कित्येक पिढ्यांपासून आपले काही बांधव हे दुर्बल आहे,सुख-संपत्ती पासून वंचित आहेत ह्या लोकांसाठी काही तरी केले पाहिजे असा मानस आम्ही नेहमी ठेवतो.त्या माध्यमातून विविध सामाजिक संस्था,दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून मदतीचा हात पोहचवण्याचे कार्य प्रामाणिकपने मी पार पाडत आहे.त्यांच्या भौतिक-पायाभूत सोई सुविधांसोबत कोरोना काळात अनेक मित्र परिवाराच्या माध्यमातून किराणा किटचे वाटप या मागील काळात केले आहे.
मेडिकल कँपचे आयोजन नेहमी करत आलो आहोत.आज ही या देव माणसांच्या कृपेने माझ्या गोर गरीब बांधवांना दिवाळीची भेट मिळाल्याने मनाला आनंद व समाधान प्राप्त झाले.ह्या सर्व देव माणसांनी जेवढं आमच्या बांधवांसाठी केले त्याच्या कित्येक पटीने त्यांना त्यांच्या आयुष्यात पुण्य लाभावे ही ईश्वराकडे प्रार्थना….
ग्रुप मधील सदस्य गुलाबदादा बनकर,राजेंद्र वाळुंज सर,अजयशेठ जाधव,सरपंच हर्षलभाऊ जाधव,ओंकारदादा सावंत,सुर्यकांत जाधव साहेब,डॉ.दिपक गावडे सर तसेच गावचे ग्राम.सदस्य राजारामदादा खंडागळे,पेसा अध्यक्ष स्वप्निल जाधव व आमच्या गावचे पोस्टातील अधिकारी संजयमामा चौधरी,माझा छोटा भाऊ इं.ओंकार घोलप,निलेशनाना घोलप या सर्वांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम पार पडला.
जगाच्या कल्यांना संताच्या विभूती,देह कष्टविती परउपकारे…?
सामजिक,शिक्षण,आरोग्य,धार्मिक स्तरावर जगभर सुरू असलेल्या या ग्रुप मधील सर्वच सदस्यांचे मोलाचे योगदान ह्या कार्यात असले तरी आमचे नाव कुठे ही नको किंवा आम्हाला कुठलाच आदर,सन्मान,सत्कार नको ही भावना फार मोठी व आदर्श होती.सरतेशेवटी पारंपरिक घरगुती जेवण करून सर्वांनी समाधान व्यक्त केले.तसेच आमच्या आदिवासी भागातील अनेक वाड्या-वस्त्यांची माहिती देऊन भविष्यात त्या ठिकाणी विविध उपक्रम घेऊ शकतो असे नम्रपणे सुचवले.
शेवटी एवढंच म्हणेल –
हेचि दान देगा देवा तुमचा विसर न व्हावा…मनपूर्वक धन्यवाद..
: अजिंक्य किरण घोलप (सरपंच,खामगाव)
#शिवजन्मभूमी #जुन्नरतालुका
Leave a Reply