नंदूरबार जिल्हातील (Astamba Rushi Yatra) आस्तंबा पर्वतची उल्लेखनिय माहिती.

Astamba Rushi Yatra : नंदूरबार जिल्हातील आस्तंबा पर्वतची उल्लेखनिय माहिती.

Astamba Rushi Yatra
Astamba Rushi Yatra

Astamba Rushi Yatra : अस्तंबा ऋषीची यात्रा सातपुडयातील उंच डोंगर…. दोन्ही बाजुला असलेल्या हजारो फुट खोल दरी…. नागमोडी खडतर रस्ता.. असा हा खडतर प्रवास, निरसर्गरम्य वातावरणात समुद्र सपाटीपासुन ४ हजार फुट उंच शिखरावर असलेले अस्तंबा ऋषीचे विश्राम स्थान.. अस्तंबा ऋषीच्या दर्शनाची ओढ़ घेवुन घोषणा करीत भाविक हजारो फुट शिखर सहज चढतात.

अस्तंबा ऋषी महराज ची दिवाळी. ( Astamba Rushi Yatra )

दिपावली पर्वावरील धनत्रयोदशीला अस्तंबा ऋषीची यात्रा भरते. ह्या यात्रेला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील हजारो तरुण पदयातत्रेने अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी शिखराकड़े रवाना होतात. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेचे भाविकांना आकर्षण असते. म्हणुनच या यात्रेला येणा-या भाविकांची संख्या वर्षानवर्ष वाढत आहे.

अस्तंबा ऋषीचे देवस्थान. Astamba Rushi Yatra

समुद्र सपाटीपासुन ४ हजार फुट उंच शिखरावर अस्तंबा ऋषीचे देवस्थान आहे. भाविकांची अपार श्रधा असल्याने हाती भगवा झेंडा घेत `अस्तंबा ऋषी महराज की जय ‘ चा जयघोष करीत भाविक पदयात्रेने हजेरी लावतात. दिवाळीच्या पर्वावर धनत्रयोदशीला यात्रोत्सवाला प्रांरभ होत असते. शापस्थ अवस्थेत जखमांनी विव्हळणारा अश्वस्थामा आपल्या जखमांसाठी सातपुडयाचा द-याखो-यात तेल मागतो.

सातपुडयाच्या अस्तंबाचा उल्लेखनिय माहिती. (Astamba Rushi Yatra )

आजही शिखरावर जाणा-या यात्रेकरूंणा तो भेटतो व वेळप्रसंगी रस्ताहीन झालेल्या यात्रेकरूंना मार्गदर्शन करतो, अशी अस्तंबा ऋषीचे दंतकथा आहे. अश्वस्थामा यांचा महाभारतात उल्लेख असला तरी त्यांचे स्थान भारतात कुठेही आढळत नाही. मात्र अश्वस्थामा ( अस्तंबा ) उल्लेख सातपुडयाच्या कुशिमधे उंच शिखरावर असल्याचे दिसुन येते. 

Related News Post : 

Astamba Rushi Yatra

दिवाळीच्या पर्वाला अस्तंबा ऋषीच्या यात्रेला प्रारंभ होतो. तळोदा येथुन एक दिवस अगोदरच कॉल्लेज रोडपासुन वाजत-गाजत मिरवणुकीने मंदिराचे दर्शन घेवुन यात्रेकरू अस्तंबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात. कोठार, देवनदी, असली, नकट्यादेव, जूना अस्तंभा, भिमकुंड्या या मार्गाने अस्तंबा ऋषी यात्रेला जातात.

Astamba Rushi Yatra बारा पडाव

महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हातील धडगाव तालुक्यातील सातपुडा पर्वतावर हे उंच शिखर असतंबा ऋषी हेदेवस्तान आश्विन महिन्यात दिवाळीला वसू बारस पासून ही यात्रा सुरू होते. नंदूरबार जिल्हातील तळोदा तालुक्यातुन पायी येणारे भाविक तळोदा येथुन येतांना सात दर्शन व बारा पडाव येतात. ते खालीलप्रमाणे आहे .

 • १) देराणी जेठाणी दर्शन दलेलपूर, तळोदा ,ता , हद्दीत येते.
 • २) गोर्यामाळ , दर्शन तळोदा,ता, हद्दीत येते
 • ३) नकट्या देव दर्शन धडगाव ,ता,हद्दीत येते
 • ४) जुना असतंबा दर्शन धडगाव ,ता,हद्दीत येते.
 • ५) भीम कुंड नदी येथे दर्शन स्नान करून शिखर चढण्याची सुरुवात होते.
 •  ६) असतंबा ऋषी दर्शन.
 •  ७) डुग डुग्या पथथर.
 •  ८) मामा भाचे दर्शन.
 •  ९) देव नदी.
 • १०) चांदसैली पडाव  .
 • ११) कोठार गावी दिवाळी होते हेगाव तळोदा तालुक्यात येते.
 • १२) यात्रेची सांगता तळोदा शहरात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 

 मोठ्या जल्लोषात होते, असे हे सातपुड्यात बसलेले हे देवस्थान निसर्ग रम्य आहे सर्व भाविकांना असतंबा यात्रा व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

हेही वाचा : 

#अस्तंबाडोंगर #gane अस्तंबा#डोंगर #नंदूरबार #AstambaInformation #Astambahistory #Astambarodalisong

नंदूरबार जिल्हातील अस्तंबाचा उल्लेखनिय माहिती. Astamba Rushi Yatra

 


Astamba Rushi Yatra  Hit song.

 

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *