घरी जायला रस्ता नाही सरकारला मागितले हेलिकाप्टर!! तालुक्यात चर्चेचा विषय.
सेवानिवृत्त माजी सैनिकांनी घरी जाण्यासाठी केली मुख्यमंत्र्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी….
{ अविनाश देशमुख शेवगांव } *शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील रहिवासी श्री दत्तात्रय भापकर या सेवानिवृत्त माजी सैनिकाने आपल्या हनुमान वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याकारणाने मला हवेतून म्हणजे हेलिकॉप्टर मधून जावं लागणार आहे यासाठी मला हेलिकॉप्टर खरेदी करायचे आहे व यासाठी मला सरकारी अनुदान मुख्यमंत्री यांनी द्यावे अशी मागणी सेवानिवृत्त माजी सैनिक दत्तात्रय भापकर यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
घरी जायला रस्ता नाही सरकारला मागितले हेलिकाप्टर!! |
सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर आपले सेवा निवृत्ती चे नंतरचे जीवन हे आनंदाने सुखा समाधानाने जावे असे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांची इच्छा असते. परंतु शेवगाव तालुक्यातील सेवानिवृत्त आर्मी जवान दत्तू भापकर यांना मात्र वेगळा अनुभव आला आहे. *सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपले गाव सालवडगाव येथे आपला पुढील उदरनिर्वाह करण्याचे ठरवले. ते सालवडगाव येथील हनुमान वस्तीवर राहतात. या वस्तीवर न येण्या जाण्यासाठी रस्ता आहे. ना शाळेत मुलांना जाण्यासाठी रस्ता आजारी असलेल्या व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय सुविधाही मिळत नाहीत.
या वस्तीवर स्वातंत्र्यानंतरही ७५ वर्षे लोटून अद्याप पर्यंत रोड नसल्याकारणाने त्यांनी अनेक वेळा सरकारी दरबारी या संदर्भात पाठपुरावा केला. परंतु त्यांना सरकारी दरबारी न्याय मिळालाच नाही. शेवटी त्यांनी वैतागून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मला रस्ता नसल्याकारणाने अनुदानित हेलिकॉप्टर घ्यायचे आहे. यासाठी मला मुख्यमंत्री यांनी सरकारी अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे आज केली आहे.
*या निवेदनाच्या प्रती त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अहमदनगर दक्षिणेचे खासदार सुजय विखे, शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, शेवगावचे तहसीलदार छगन वाघ यांना पाठविलेल्या आहेत.
*ताजा कलम.
*एका मराठी सिनेमा मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे यांची विहीर हरवली होती तसा सलवाडगाव ते हनुमानवस्ती हा रस्ताच गायब झाला आहे तो कोणी आमदार खासदार वा एखादा सरपंच किंवा जिल्हापरिषद सदस्य पंच्यातसमिती सदस्य नक्की सापडून देईल नाहीतर यां माजी सैनिकाचे धुंडतें रह जाओगे बंद होईल.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*