तीन ग्रामपंचायतींमध्ये सुमारे दोन कोटींचा अपहार.
सरपंच, ग्रामसेवकांना वसुलीच्या नोटिसा : फौजदारी दाखल करण्याची तयारी.
ग्रामसेवकांमार्फत बजावल्या नोटिसा.
गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायत पातळीवर कामे न करता बिल काढणे, अनावश्यक कामे करणे, ग्रामनिधी, पाणीपुरवठ्याच्या देयकांच्या रकमेची अफरातफर करणे, असे प्रकार करून तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवकांनी सुमारे दोन कोटींच्या रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने संबंधितांना वसुलीच्या नोटिसा बजावल्या असून, फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारीही चालविली आहे. गावपातळीवरील विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकऱ्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी आहे. केंद्र व राज्य सरकारकडून थेट शासनाने ग्रामपंचायतींना विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जात असतांना त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामसेवक व
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने गटविकास अधिकाऱ्यांना कारवा ईसाठी सूचना केल्या आहेत. त्याआधारे गटविकास अधिकाऱ्यानी ग्रामपंचा यतींच्या ग्रामसेवकांवर नोटिसा बजावण्याची जबाबदारी सोपविली आहे.
शेवगेडांग ग्रामपंचायतीच्या कौसाबाई करवंदे, साहेबराव उत्तेकर, साहेबराव खांडवी, उपसरपंच कमल पोरजे, जिजाबाई शिद, ग्रामसेवक सुंदर मासाळ आदींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, ग्रामपंचायतीतील गैर- व्यवहार उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली असून, दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
९४८ रुपयांचा अपहार झाल्याचे
सरपंच यांच्यावर कायद्याने निश्चित संगनमत करून निधीचा अपहार आले आहे. केली आहे. त्यात प्रामुख्याने रस्ते पाणीपुरवठा, गटार याबरोबरच आहेत. आरोग्य, शिक्षण, शासकीय योजनांची अंमलबजावणी, रोजगार हमी योजनेची कामे, शासकीय अनुदानाचे वाटप, लाभार्थ्यांची निवड आदी कामे केली जातात. त्यासाठी शासन आदेशानुसार निविदा प्रकिया राबवून कामे करणे, खरेदीसाठी ठरवून दिलेल्या दरपत्रकाप्रमाणे पक्क्या बिलावर खरेदी करणे क्रमप्राप्त ठरते. तथापि, गावगाडा हाकताना सरपंच व ग्रामसेवक या दोघांकडूनच
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे दप्तर तपासणी केली असता, त्यात अनेक गंभीर दोष आढळून आले आहेत. एवढेच नव्हे, तर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाबही निदर्शनास आली आहे. त्यात प्रामुख्याने सुरगाणा तालुक्यातील खोकरी ग्रामपंचायतीत सन २०१६- १७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या काळात सुमारे ८५ लाख २२ हजार जात आहे.
आढळून आले आहे. सिन्नर तालुक्यातील सोनांबे ग्रामपंचायतीच्या दोन वर्षांच्या कारभारातच ३० लाख ३८ हजार ९४५ रुपयांचा अपहार झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग ग्रामपंचायतीतही सन २०२७-२७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या काळात ९४ लाख २२ हजार ५८६ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस
करण्याचे प्रकार वाढीस लागले या गैरव्यवहारात गेल्या पाच वर्षांतील सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांचा समावेश असून, येत्या तीन महिन्यांच्या आत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्याच्या सूचनाही ग्रामपंचायत विभागाने गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नोटिसा बजावल्यानंतरही जर अपहाराची रक्कम भरली नाही तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी केली.
Leave a Reply