उशाला नर्मदा तरी झऱ्यावरून थेंबाथेंबाने भरावे लागते पाणी तिनसमाळला तीव्र पाणीटंचाई: हंडाभर पाण्यासाठी पायपीट, उपाययोजना करण्याची मागणी
नंदुरबार तिनसमाळला तीव्र पाणीटंचाई: हंडाभर पाण्यासाठी पायपीट, |
नंदुरबार : देशात स्वातंत्राचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना धडगाव तालुक्यात सुविधांची वानवा आहे. एवढेच नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठी आजही तिनसमाळवासींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे “धरण उशाला आणि कोरड घशाला” असे विदारक चित्र आहे.
धडगाव-तिनसमाळ येथील ढुठ्ठल पाडा व घुडानचा पाडावर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. दऱ्याखोऱ्यातून घाटमाथ्यावरून मैलोनमैल चालत खोल दरीत उतरून पाण्याच्या झऱ्याजवळ जाऊन पाण्याची तहान भागवावी लागत आहे. परिसरातील महिलांना नुसतीच पायपीटच नव्हे तर पहाटे चार वाजेपासून थेंबा थेंबासाठी तासन्तास पाण्याच्या झऱ्यापाशी ठाण मांडून बसावे लागते. तेव्हा कुठे हंडाभर पिण्याचे पाणी नशिबी मिळत आहे.
स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्षी आजादी का अमृतमहोत्सव साजरा होत असला तरी, आजही आदिवासी समाज “विकासापासून कोसो दूर” आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना आपल्या तान्हुल्या बाळांना सोबत घेऊन जीव धोक्यात टाकून दरीखोऱ्यातून आणि घाटातून मार्ग काढावा लागत आहे.
गावातील महिलांसह आबालवृद्ध हे दोन ते तीन किलोमीटर घाटात पायी चालून त्यांना पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. कमी पाणी मिळत असल्यामुळे पाण्यासाठी प्रसंगी झऱ्याजवळच वाद सुरू होतात. इतर कामे सोडून महिला पाणी राखून दिवसभर बसून राहावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे.
नंदुरबार तिनसमाळला तीव्र पाणीटंचाई: हंडाभर पाण्यासाठी पायपीट, |
जानेवारीच्या पहिल्याच महिन्यापासून पाणीटंचाईच्या तीव्र झळा गावकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत. दरी व घाटातून झरा गाठावा लागत असल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. जानेवारी महिन्यातच अशी स्थिती आहे तर, मे आणि जून महिन्यात काय परिस्थिती निर्माण होईल, याचा विचार न केलेला बरा. गावात पाण्यासाठी कोणतीही सोय नसल्यामुळे पाण्याची टंचाई भासत आहे. त्यासाठी येत्या काळात किती यातना सहन कराव्या लागतील, असे गावकरी गान्हाणे मांडत आहेत.
दररोज सकाळी महिला, लहान मुले, वयोवृद्ध घाटात उतरून नैसर्गिक स्रोतातून पाणी भरून आणत आहेत. दिवसातून दोन ते तीन वेळा नैसर्गिक स्रोत असलेल्या झऱ्यातून पाणी आणावे लागते तेव्हाच पुरेसे पाणी मिळते, नाही तर पाण्याविना दिवस काढावे लागतात.
धडगाव तालुक्यातील तिनसमाळ परिसरातील दरीतून पिण्याचे पाणी घेऊन जातांना महिला.
प्रशासनाने गांभीयनि लक्ष देण्याची गरज
■ जंगल व घाटाचा भाग असल्यामुळे हिंस्र प्राण्यांचा या परिसरात वावर आहे.
मागील काही वर्षात दोन मुले व एक वृद्ध पाणी भरण्यासाठी गेल्याने बिबट्याने हल्ला करून त्यांना जीवे ठार केले होते. याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीयनि लक्ष देण्याची गरज असून किमान पिण्याचा पाण्याची सोय करून द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त्त केली आहे.
शबरी घरकुल योजना मागणी अर्ज कसा करावा.
मागील एक वर्षांपासून मनरेगा योजनेतून वैयक्तिक सिंचन विहिरीची मागणी केली आहे; परंतु, मंजुरी मिळत नसल्यामुळे योजनेपासून गाव वंचित आहे. गावपाड्यात एकही शासनाची विहीर किंवा इतर सुविधा नाही.
प्रत्येक पाड्यातील रहिवासी घाट, दारीतूनच पाणी वापरतात. नागरिकांच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन उपायोजना करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागातून किंवा मनरेगा योजनेतून उपाययोजना केल्यास पाणी मिळण्यास शक्य आहे: परंतु, योजना राबविणार कोण? -लक्ष्मण मोगरा पावरा, ग्रामस्थ,
ग्रामीण माहिती साठी तेथे क्लिक करा
दिवसभर नैसर्गिक स्रोतांवर पाणी राखून बसावे लागते. तासनतास पाण्यासाठी एका ठिकाणी थांबून राहावे लागते. -सकीबाई राजेंद्र पावरा, महिला,