न्यू बोराडी गावात विश्व आदिवासी दिवस उत्साहात संपन्न.| New Boradi 9 August Indigenous Tribal Day.
शिरपूर: तालुक्यातील न्यू बोराडी गावात शिक्षक श्री. दिलवरसिंग पावरा यांनी , जि. प. मराठी शाळेच्या विद्यार्थी सह. न्यू बोराडी गावात विश्व् आदिवासी दिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
यावेळी आदिवासी भगवान बिरसा मुंडा क्रांतीवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गावातील शाळेच्या चिमुकल्यांनी आदिवासी पेहराव परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. जि. प. मराठी शाळा चा विद्यार्थीयांना आदिवासी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच दर वर्षी जागतिक आदिवासी दिनाचा इतिहास लहान मुलांना लक्षात राहावा या करिता सांगितला गेला.
हेही वाचा : 9 अगस्त विश्व मूलनिवासी दिवस.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत प्रभात फेरी व नृत्य सादर करीत उत्साहात साजरा केला. यावेळी शिक्षक श्री. दिलवरसिंग पावरा, सह त्यांच्या मिसेस, श्रीमती, कविता दिलवरसिंग पावरा सह विद्यार्थी यांचे पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply