अवैध दगड खदानीवर कारवाई करून अहवाल ४८ तासांच्या आत सादर करावा, तसेच गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्यास महसूल- पोलिस परिवहन अधिकारी, कर्मचाऱ्यांत संगनमत आढळल्यास वैयक्तिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी पाच तहसीलदारांना दिल्या.
हा निर्णय माहिती अधिकार अर्ज करून मागवता येईल!
जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन होत असून त्याची वाहतूक सर्रासपणे केली जाते. याकडे महसूल व पोलिस विभागाचे दुर्लक्ष होते. यासोबतच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत नसल्याचे अनेक वेळा समोर आले आहे.
काय म्हटले आहे आदेशात?
दरम्यान, अवैध उत्खनन व वाहतूकप्रकरणी कारवाई करण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी व बैठकीमध्ये सूचना दिल्या आहेत; परंतु कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भाने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच तहसीलदारांना पत्र पाठवून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.