Petrol Pump Information |
पेट्रोल पंपावरील सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार.
आजच्या धकाधकीच्या व वेगवान दुनियेत मालकीचे वाहन असणे यात आवश्यक गरज बनली आहे त्यामुळे वाहनधारकांना इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल किंवा वायू गॅस भरण्यासाठी जावे लागते.
या इंधन ग्राहकांनी केवळ पेट्रोल पंपावर जायचे आणि दिले तसे दिले इंधन भरावे आणि चालू लागावे दिवस आता राहिले नाहीत पेट्रोल पंपावर इंधन भरण्याचा ग्राहकांनी काही हक्क व अधिकार आहेत ना बरोबर ग्राहकांना काही विशेष सेवा देणे पेट्रोल पंप चालकावर बंधनकारक असून त्या सेवा जागरूक ग्राहक जागरूक वाहनधारक म्हणून आपणास माहीत असायलाच हव्यात कोणती आहेत अशा ग्राहकांची विशेष अधिकार आपण पाहूया.
पेट्रोल पंपावर ग्राहकांना विशेष सेवा पुरवणे बंधनकारक आहे.
1) गाडीचा चाकाआतील हवा चेक करणे हवा भरणे निशुल्क.
2) पिण्याचे पाणी टॉयलेट सुविधा तसेच रेडिएटर मध्ये पाणी निशुल्क.
3) तक्रार आणि सूचना पुस्तिका मागणीनुसार दिली पाहिजे त्यात आपण तक्रार लिहू शकता.
4) पेट्रोल पंप चालू व बंद असण्याच्या वेळा कामा दिवस व सुट्टीच्या दिवसात स्पष्ट तक्ता प्रदर्शित केला पाहिजे.
5) तेल कंपनीच्या अधिकाऱ्याचे नाव पत्ता आणि टेलिफोन नंबर आपण तक्रार असल्यास फोन संपर्क करू शकता.
6) पुरेसा प्रकाश स्वच्छता तसेच प्रथमोपचार पेटी असणे बंधनकारक आहे.
ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देणे हे पेट्रोल पंप चालकाचे कर्तव्य असून वरील सुविधा देणे हे पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाने दिलेल्या दिशा निर्देश आ मध्ये स्पष्ट केले असून या अशा सुविधा न देणारा पेट्रोल पंप चालकावर सुविधा विनाविलंब देण्याचे निर्देश व दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
Related Information : What is the Petrol Pump insurance? Link
Full Detail Petrol Pump insurance ? Link .
तसेच तेल उत्पादनांची गुणवत्ता तपासण्यासाठी खालील प्रमाणे ग्राहकांना अधिकार आहे.
1) प्रत्येक पेट्रोल पंपावर तेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी फिल्टर पेपर ठेवणे बंधनकारक आहे ग्राहकांनी मागितल्यास फिल्टर पेपर दिलाच पाहिजे पेट्रोल पंप आतील नोझल स्वच्छ करून फिल्टर पेपरवर पेट्रोलचे काही थेंब टाकावे दोन-तीन मिनिटानंतर फिल्टर पेपरवर्क ही दाग धब्बे दिसतील तर पेट्रोलमध्ये भेसळ आहे असे समजावे. जर फिल्टर पेपर पूर्वीप्रमाणे स्वच्छ व साप दिसला तर पेट्रोल शुद्ध आहे असे समजावे.
2) पेट्रोल पंप चालकांनी तेलाची घनता मोजण्याची व घनता नोंदणी उपकरणे ठेवली पाहिजेत.
3) पंप डीलर ची पाच लिटर चे माप ठेवणे जरुरी आहे आपण मापाने मोजून पेटल घेऊ शकता हे माप दरवर्षी वजने व मापे नियंत्रणा कडून प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.
4) तेलाच्या किमती स्पष्टपणे दिसतील अशा प्रदर्शित केल्या पाहिजेत मिटर रिडींग शून्य केले आहे याची ग्राहकांनी खात्री करून घ्यावी भेसळ असल्याचे संख्या आल्या बिल्डर पेपर परीक्षण करावे.
5) तक्रार असल्यास प्रकार पुस्तिकेत तक्रार लिहावीत ते कंपनीच्या अधिकाऱ्यांना टेलिफोन संपर्क करून तक्रार करता येईल.
6) तेल कंपनीच्या अधिकार्याचे नाव पत्ता व संपर्क क्रमांक पेट्रोल पंपावर प्रदर्शित केले नसेल तर संबंधित तेल कंपनीच्या रीजनल ऑफिस कडे तक्रार करावी तक्रार लेखी द्यावी तक्रार अर्जाची पोच घ्यावी तीस दिवसात तक्रार निवारण करणे कंपन्यांवर बंधनकारक आहे.
Facilities and Consumer Rights at Petrol Pumps |
www.consumercomplaints.info Link
Indian Oil. Link.. Waiting
Bharat Petroleum. Link waiting
Hindustan Petroleum. Link waiting
Home website Link
Help
Toll Free Number: 1800-2333-555.
LPG Emergency Helpline: 1906.