शाळा व्यवस्थापन समिती : नमस्कार मित्र बांधवांनो तुमच्या साठी एक विशेष लेख घेऊन आलो आहे. तो म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती रचना, कार्य व जबाबदारी काय आहे. अत्यंत महत्वाची माहिती वाचा.
शाळा व्यवस्थापन समिती रचना, कार्य व जबाबदारी.
१) सदर समिती किमान १२ ते १६ लोकांची राहील. (सदस्य सचिव वगळून)
२) यापैकी किमान ७५ टक्के सदस्य बालकांचे आईवडील, पालक यामधून असतील.
- अ) पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल.
- ब) उपेक्षित गटातील व दुर्बल घटकातीत बालकाच्या माता-पित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल.
- क) पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व देण्यात यावे.
3) उर्वरित 25 टक्के सदस्य पुढील व्यक्तींपैकी असतील –
- अ) स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी – एक. (स्थानिक प्राधिकरण सदर सदस्याची निवड करील)
- ब) शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक – एक.
- क) पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ/ बालविकास तज्ञ – एक.
४) वरील अ.क्र.२ मधील बालकांचे आईवडील/ पालक सदस्यांमधून, सदर समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करील.
५) शाळेचे मुख्याध्यापक/ प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
६) या समितीतील एकूण सदस्यांपैकी ५० टक्के सदस्य महिला राहतील.
Related Post :
- Z P School | जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा काही दिवसांपूर्वी प्रशासनाने बंद केली
- जि.प. शाळांमध्ये शिक्षक नाही. सीईओंच्या दालनाला ठोकले कुलूप
- विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश.
शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये काय आहे ?
(अधिनियमातील कलम-२२ नुसार शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कार्ये पार पाडावी लागतील.)
१) शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे.
२) आर्थिक वर्ष संपण्याच्या किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करुन त्याची शिफारस करणे. (परिशिष्ट ‘अ’ प्रमाणे)
३) शाळेस शासनाकडून, स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे.
४) बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे व या संदर्भातील पालक, शाळा, स्थानिक प्राधिकरण, राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देणे.
५) शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
६) अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही यांचे संनियंत्रण करणे.
७) बालकांची १०० टक्के पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य राहील याची दक्षता घेणे.
८) शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या मानके व निकष यांच्या पालनाचे संनियंत्रण करणे.
९) शाळाबाह्य व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
१०) शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्ययन सुविधांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
११) शाळेतीत मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे संनियंत्रण करणे.
१२) शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्चलेखे तयार करणे.
१३) शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे.
१४) मुख्याध्यापकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे व दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे.
१५) निरुपयोगी साहित्य रु. १,०००/- (रु. एक हजार मात्र) किंमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे.
१६) शाळागृह, इतर शालेय बांधकाम, तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यांवर देखरेख करणे.
१७) शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखीस्वरुपात सूचना देणे व त्यांचे वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे.
१८) समितीच्या सदस्यांना प्रवासभत्ता, दैनिक भत्ता अथवा बैठक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
टीप- सदर शाळा व्यवस्थापन समितीस आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील.
Related Post :
- “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियान अंतर्गत “माजी विद्यार्थी मेळावा” संपन्न.!
- शाळा-कॉलेज प्रवेशासाठी ही प्रमाणपत्रे आवश्यक.
- ग्राहक संरक्षण कायदा 2019 : THE CONSUMER PROTECTION ACT 2019
शाळा व्यवस्थापन समिती जबाबदाऱ्या काय आहे ? :
- – शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- – शिक्षक आपली कर्तव्ये पार पाडत असल्याची खात्री करणे.
- – शाळा शिक्षण हक्क कायदयाशी अनुरूप करणे.
- – शाळाबाह्य, विकलांग अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असल्याची खातरजमा करणे.
- – गावातील/ परिसरातील कोणतेही बालक शाळेच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही याची दक्षता घेणे.
- – शालेय पोषण आहार योजना व इतर सर्व शासकीय योजना यांची अंमलबजावणी सुरळीत व पारदर्शक करणे.
- – शालेय मंत्रिमंडळ/ बालपंचायतीच्या अहवालाद्वारे बालकांची मत जाणून घेणे.
- – शाळेच्या जमाखर्चाचा वार्षिक लेखा तयार करण्याची व्यवस्था करणे.
- – शाळा विकास आराखडा तयार करून स्थानिक प्राधिकरणास सादर करणे.
- – शालेय गुणवत्ता विकासामध्ये येणाऱ्या अडचणींचे निरसन करून शाळेचा विकास करणे.
- – शालेय उपक्रम व अध्ययन प्रक्रिया यांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
- – महिन्यातून किमान एक बैठक घेणे. बैठकीचे इतिवृत्त सर्व पालकांना उपलब्ध करून देणे.
- – आपले ध्येय (१००% पटनोंदणी १००% उपस्थिती.)
शाळा व्यवस्थापन समितीसाठी मार्गदर्शक सूचना काय आहे ? :
1) शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्येक महिन्याला किमान एक बैठक आयोजित करावी.
2) शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नावे फलकावर लावण्यात यावी.
3) शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी व शिक्षकांनी एमेकांनांचा आदर करावा.
4) समिती सदस्य व शिक्षक यांनी एकमेकांच्या सहकार्याने शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करावेत.
5) शाळेच्या सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये विहित प्रक्रियेचा अवलंब करण्यात यावा. त्यात पारदर्शकता असावी.
6) शाळेच्या विकासास साहाय्यभूत ठरेल असा शाळा विकास आराखडा तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात यावी.
7) बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्थानिक कलाकारांच्या मदतीने उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
8) उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चांगले काम करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य/ मुख्याध्यापक/ शिक्षकांचा सन्मान करण्यात यावा.
9) विद्यार्थी लाभाच्या योजनांची तसेच शाळेस शासनाकडून मिळणाऱ्या निधीची माहिती अद्ययावत करून शाळेच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करावी.
शाळा व्यवस्थापन समिती ठराव नमूना काय आहे ? :
शाळा व्यवस्थापन समिती सभा क्र.3 ठराव क्रमांक – 1
विषय – शालेय साहित्य खरेदी करणेबाबत.
आज दि. …… रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभेतील विषय क्रमांक-1 शालेय साहित्य खरेदी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती सचिव यांनी सदर साहित्य खरेदीबाबतची यादी सर्वांना वाचून दाखवली. यादीतील सर्व साहित्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले. त्यानंतर साहित्य खरेदीची यादी अंतिम करण्यात आली. चर्चेअंती यादीनुसार साहित्य खरेदी बाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
ठराव सर्वानुमते मंजूर..!!
सूचक –
अनुमोदक –
अध्यक्ष/ सचिव
शाळा व्यवस्थापन समिती
शिक्षण हक्क कायदा २००९ काय आहे ? :
- – १ एप्रिल २०१० पासून अंमलबजावणी.
- – ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीच्या शिक्षणाची हमी.
- – विशेष गरजा असलेल्या विदयार्थ्यांसाठी वयाच्या १८ वर्षापर्यंत मोफत शिक्षणाची हमी.
- – आपल्या पाल्यास शाळेत दाखल करणे हे पालकांचे कर्तव्य.
- – वयाच्या १४ वर्षांपर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण न झाल्यास त्यानंतरही इ. ८ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी.
- – प्रवेशाच्या वेळी बालक व पालक यांच्या मुलाखतीस प्रतिबंध, प्रवेशासाठी वयाचा पुरावा सक्तीचा नाही.
- – पूर्वीच्या शाळेचा दाखला नसेल तरीही शाळा प्रवेश.
RTE ACT-2009 ची ठळक वैशिष्ट्ये काय आहे ? :
१) आपल्या पाल्यास शाळेत दाखल करणे हे पालकांचे कर्तव्य.
२) शाळाबाह्य मुलांना वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश.
३) शाळाबाह्य मुलांना विशेष प्रशिक्षणाची सुविधा.
४) कोणत्याही प्रकारच्या भेदभावास प्रतिबंध.
५) कोणत्याही प्रकारच्या शारीरिक शिक्षेस व मानसिक छळास प्रतिबंध.
६) बालकास कोणत्याही वर्गात मागे ठेवता येणार नाही.
७) बालकाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढता येणार नाही.
८) इयत्ता ८ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळणार.
९) तक्रार निवारण करण्यासाठी राज्य बाल हक्क आयोगाची स्थापना.
१०) बालस्नेही शिक्षणासाठी भौतिक सुविधांची उपलब्धता.
Related Post :
- Agriculture Scheme : महाडीबीटी कृषी योजनेमार्फत शेतकऱ्यांना मिळणार लाभाच लाभ.
- प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना / Mahadbt Scheme Plastic Mulching Paper
- राष्ट्रीय आरोग्य विमा योजना नोंदणी Best Mahiti | National Health Insurance Scheme Registration.
- जिल्हापरिषद प्राथमिक शाळेजवळील त्या वादग्रस्त. |The controversial one near Zilla Parishad Primary School.
शाळा व्यवस्थापन समिती गठन काय आहे ? –
1) स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय व अनुदानित शाळांमध्ये समितीची स्थापना.
2) समितीचा कार्यकाल २ वर्षे, २ वर्षांनंतर पुनर्रचना.
3) मुख्याध्यापक/ केंद्रप्रमुख यांनी शाळा व्यवस्थापन समितीची रचना / पुनर्रचना करण्यापूर्वी पालक सभेत समितीविषयक सर्व माहिती देणे आवश्यक.
4) समितीची रचना राजकीय/ सामाजिक दबावाखाली न करता पालकसभेत खेळीमेळीच्या वातावरणात व कायद्यातील/ नियमावलीतील तरतुदींच्या आधारे करावी.
5) समितीचे ७५% सदस्य बालकांचे माता पिता किंवा पालक उर्वरित २५% सदस्यांमध्ये मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायत/ म.न.पा./ न.पा. सदस्य, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ किंवा बालविकासतज्ज्ञ यामधून निवड केलेल्यांचा समावेश.
6) किमान ५०% सदस्य, महिला.
7) स्वीकृत सदस्य म्हणून शाळेतील २ विद्यार्थ्यांची निवड (किमान १ मुलगी असावी.)
8) पालक सदस्यांमधून अध्यक्षांची निवड करण्यात येईल. शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव असतील.
9) विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे माता, पिता किंवा पालक यांना प्रतिनिधीत्व देने अनिवार्य राहील.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.
Related Notification Information : | Click Here |
Official Website Information | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Leave a Reply