शितल कोकणी यांच्या अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्राची चौकशी करा : गुलाब पावरा यांची मागणी.
शिरपूर : तालुक्यातील श्रीमती शितल रामचंद्र कोकणी मु. पो. पळासनेर यांनी बनावट कागदपत्रे सादर करून अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवले आहे. श्रीमती शितल रामचंद्र कोकणी यांचे खरे नाव शितल रामचंद्र कोळी असे असून त्यांचे लग्न पळासनेर येथील छोटू भिकन कोळी यांच्याशी झालेले आहे.
त्यांचे माहेर सांगवी येथील आहे, व त्यांचे परिवारातील सर्व व्यक्तीचे आडनाव कोळी आहे. श्रीमती शितल रामचंद्र कोकणी (कोळी) यांच्या घरातील सर्व व्यक्तींचे आडनाव हे मौजे सांगवी ता. शिरपूर येथील स्वस्त धान्य दुकान कन्झ्युमर यादी व मतदार यादीनुसार कोळी असे आहे.
श्रीमती शितल रामचंद्र कोकणी यांची मूळ जात कोकणी नसून कोळी अशी आहे. त्यांनी शासनाची दिशाभूल करून अनुसूचित जमातीचे (कोकणी) जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवले आहे.
त्यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गुलाब पावरा यांनी सह आयुक्त व पोलीस उप अधीक्षक, दक्षता पथक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे यांच्याकडे केली.
Leave a Reply