शिरपूर तालुक्यातील उमर्दा ग्रामपंचायत येथील घटना. |
पित्याचा खून करणारा पुत्र जेरबंद!
आरोपीस पोलीस कोठडी शिरपूर तालुक्यातील उमर्दा ग्रामपंचायत येथील घटना.
शिरपूर : तालुक्यातील उमर्दा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कढईपाणी येते पती- पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 72 वर्षीय बापाचा खून मुलाने केला होता घटना घडल्यानंतर तो फरार झाला होता पोलिसांनी त्यास शिरपूर तालुक्यातील अपसिंगा पाडा येथून शनिवारी अठरा रोजी रात्री ताब्यात घेतले त्याला न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला
शिरपूर – तालुक्यातील उमर्दा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे कढई पाणी येते पेमा हेरा पावरा 72 वर्षीय हे पत्नी सोबत राहतात तर त्यांचा मुलगा सुक्राम पेमा पावरा 51 वर्ष हा त्याच्या पत्नीसोबत घरासमोरच विभक्त राहतो.
दिनांक 16 रोजी मुलगा सुक्राम व सून यांचे भांडण सोडवण्यासाठी वृद्ध वडील गेले असता त्याचा राग मनात धरून मुलांनी ती क्षणात त्याने त्याच्या पाठीवर वार करून त्यांचा खून केला. घटना घडताच संशयित आरोपी फरार झाला होता याबाबत सांगली पोलिसात बापाचा खून केल्याप्रकरणी मुलाविरुद्ध कुणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
शाल काकडे होता आश्रयाला.
बापाच्या त्या प्रकरणी फरार असलेला आरोपी सुक्राम पावरा यांच्या बाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी सुक्राम त्याच्या शाल काकडे अपसिंगपाडा येथे असल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्यासह पोलीस हे. कॉ. संजय सूर्यवंशी प्रवीण धनगर संतोष पाटील मुकेश पावरा, रोहिदास पावरा, कृष्णा पावरा, संजय भोई या पथकाने आपसिंग पाडा येथे सापळा रचून आरोपी जेरबंद केले.
शिरपूर न्यायालयात केले हजर.
त्याला शिरपूर येथील न्यायालयात रविवारी 19 रोजी हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठे करीत आहे.
Leave a Reply