सहलींसाठीच्या नियमावलीकडे शाळा आणि पालकांचे होतोय दुर्लक्ष मुलांना सहलीला पाठवताय? तर हे नियम लक्षात असू द्या | शिक्षण विभागाकडून सहलीसाठी नियमावली असते. नियमावली पालक तसेच शिक्षकांना माहीत नाही.
सहलींसाठीच्या नियमावलीकडे शाळा आणि पालकांचे होतोय दुर्लक्ष मुलांना सहलीला पाठवताय? |
स्पेशल रिपोर्ट पिंपरी : विद्यार्थ्यांना ऐतिहासिक आणि भौगोलिक ठिकाणांना भेट देता येते. मात्र, अनेकदा शैक्षणिक सहलीदरम्यान नीट काळजी न घेतल्याने अपघात घडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून सहलीसाठी नियमावली जाहीर केलेली आहे. त्यामध्ये समुद्र किनारे, जोखिमेची पर्वतावरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी तसेच उंच टेकड्या अशा ठिकाणी शाळांच्या सहलीचे आयोजन करू नये. लहान मुलांची सहल एका दिवसाची असावी. सहलीला जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा रक्तगट माहिती असावी, अशा बाबींचा समावेश आहे. मात्र, ही नियमावली पालक तसेच शिक्षकांना माहीत नाही,
दिवाळीच्या सुट्टयानंतर शाळा पुन्हा गजबजू लागल्या आहेत. शैक्षणिक नियोजनानुसार शाळांचा डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा कालावधी हा शैक्षणिक सहलींचा असतो. त्यामुळे शाळेकडून त्याची तयारी सुरू झाली आहे. सहलीसाठी शाळांकडून एसटी महामंडळाच्या बस बुक करण्यात येत आहेत. शैक्षणिक सहलीसाठी एसटीकडून दरात तब्बल ५० टक्के सवलत दिली जाते. खासगी बसने प्रवास करणे धोकादायक आहे.
एसटीकडून सवलत विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी तब्बल ५० टक्के तिकीट दरात सवलत एसटी महामंडळाकडून देण्यात येत आहे. इतर वाहतुकीसाठी वाहतुकी प्रतिकिलोमीटर ५५ रुपये तिकीट दर आकाराला जातो. मात्र, शाळांना ५० टक्के सवलत देते. एसटी महामंडळाकडून प्रवाशांचा विमा देखील उतरवला जातो.
Related News : नवादेवी धबधबा आणि मंदिर ची रोचक माहिती.
मुलीकडून सहल महाबळेश्वरला जाणार आहे असे सांगण्यात आले होते. शिवाय सहलीसाठी परवानगी असल्याच्या पत्रावर सही घेतली होती. मात्र, इतर माहिती शाळेकडून देण्यात आली नव्हती.– सागर मोरे, पालक
पालकांचे संमतीपत्र आवश्यक
■ शैक्षणिक सहली काढताना संबंधित शाळेच्या
मुख्याध्यापकाला शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असते. दुसरीकडे, सहलीला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती आवश्यक आहे.
• अनेकदा समुद्र किनारी तसेच डोंगरीभागात सहल गेली तर तेथे अपघाताचा धोका असतो. हे ओळखून शैक्षणिक विभागाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी काळजी घेण्याची सूचना शाळांना करण्यात येते.
खासगी वाहनांबाबत घ्या काळजी
शक्यतो शैक्षणिक सहल परिवहन महामंडळाच्या बसमधूनच जाव्यात, अशी अपेक्षा असते. खासगी वाहनातून सहली जाताना त्या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र आहे का, आरटीओने त्याला एनओसी दिली आहे का, या बाबीदेखील पाहणे बंधनकारक आहे. या सर्वांची जबाबदारी ही शाळेच्या मुख्याध्यापकांवर असते.
Related News : What is the bank insurance?
गेल्यावर्षी फक्त शैक्षणिक सहल काढताना एसटी बसकडून पिंपरी-चिंचवड आगारात संपर्क साधला जातो. ज्या शाळा मान्यताप्राप्त आहेत त्यांना भाडेदरात सवलत देण्यात येते. तब्बल ५० टक्के सवलत अनुदानित शाळांना दिली जाते. परवानगी नसलेल्या खासगी शाळांना कुठल्याही प्रकारची सवलत दिली जात नाही.– वर्षा डहाके, स्थानक प्रमुख, पिंपरी-चिंचवड आगार
अपघात झाला तर जबाबदार कोण?
शिक्षण विभागाने दिलेल्या नियमावलीच्या पालन न करता शैक्षणिक सहल आयोजित केली आणि अपघात झाला त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रशासनाला जबाबदार धरण्यात येणार आहे.
सहल आयोजित करत असताना त्या बस चालकाकडे सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत की नाही? बसला फिटनेस प्रमाणपत्र आहे की नाही? याची तपासणी मुख्याध्यापकांनी करायची आहे.
Leave a Reply