ग्रामपंचायत भाटपुरे येथे ग्रामसभा संपन्न.
भाटपुरा ग्रामपंचायतीचे बैमानी कारभारामुळे गावाचा विकास खरंबडून पडला आहे. गावाच्या सत्तेत असणाऱ्या गाव पुढार्यांच्या गटागटात विभागणी झालेली आहे. ज्यांनी इलेक्शन पुरता एकता दाखवली तदनंतर मात्र वेगवेगळ्या कारणाने ही वेगळी झाली आणि याचा फटका भाटपुऱा गावातील सर्वसामान्य जनतेला बसत आहे. ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांची एकीकरणाची भूमिका नसल्यामुळे अनेकांना याचा तोटा होत आहे.
1 मे ची ग्रामसभा आता घेण्यात आली या ग्रामसभेमध्ये
1. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006
2. आर्थिक वर्षाचा जमाखर्च.
3. भाटपुरे गावात झालेल्या विकास कामांवर चर्चा.
4. जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी यांना मिळालेला साहित्यांची पडताळणी.
5. त्याचबरोबर घराच्या स्वरूपात मिळालेला पैसा.
6. वित्त आयोगाचा एकूण मिळालेला पैसा जमा खर्च.
यासारख्यांवर विषयावर चर्चा झाली तर आयत्यावेळी.
ग्रामस्थांनी वेगवेगळ्या आपापल्या समस्या मांडल्या त्यामध्ये उपोषणाला आम्ही ग्रामस्थ बसलो असता आमच्या मागण्या लेखी स्वरूपात होकारार्थी उत्तर दिल्यानंतर त्याला दहा दिवसात करून देऊ असं आश्वासन दिल्यानंतरही तब्बल एक महिना उलटून गेल्यानंतरही त्या कामाची जैसे थी परिस्थिती आहे त्याची देखील चौकशी केली व त्यावर चर्चा घडवून आणली.
या चर्चेवर सर्व तरुण मंडळींनी अतिशय सकारात्मक अशी चर्चा केली आणि ग्रामपंचायत भाटपुरा यांनी पुन्हा एकदा आश्वासन दिले आहे.
भाटपुरा ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेत इतिहासामध्ये पहिल्यांदा तरुणांनी अतिशय जबरदस्त, बेधडकपणे आपापली समस्या व मते मांडली.
सर्वात शेवटी
ग्रामसभा आपल्या नागरिकांसाठी आपलं हक्काचं व्यासपीठ आहे या ग्रामसभेमध्ये आपण आपली समस्या बेधडकपणे मांडू शकतात, सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी जी जनता खुर्चीवर बसवते ती खाली पण उतरू शकते याचा पूर्ण अधिकार जनतेला, खोटे आश्वासन दिल्यास जनता जबरदस्त उत्तर देते याचा सगळ्यांचा भान ग्रामपंचायत भाटपुरा यांनी ठेवणे आवश्यक आहे.